शब्दगंधचा कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीधर आदिक यांना जाहिर
शब्दगंधचा कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीधर आदिक यांना जाहिर
“शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.श्रीधर आदिक यांना जाहिर करण्यात येत आहे,” अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
कॉ.गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन रविवार दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी असुन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कोहिनुर मंगल कार्यालयात दु. १२.३० वा. होणाऱ्या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी ऍड.कॉ.सुभाष लांडे पाटील व स्मिता पानसरे उपस्थित राहणार आहेत.
कष्टकरी,श्रमिक,शेतकरी, शेतमजूर,असंघटित कामगार यांच्यासाठी अविश्रांतपणे काम करणारे कॉ.श्रीधर आदिक उमेदीच्या काळापासुन कार्यरत आहेत,ऊस तोडणी मजुर, महिला,शेतमजूर,कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली,त्यामुळे त्यांना हा पुरस्कार शनिवार दि.२० फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी व खजिनदार भगवान राऊत,प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य उपाध्यक्षा शर्मिला गोसावी यांनी केले आहे.