गुन्हेगारी
तहसीलदार फसियोद्दीय शेख यांच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टॅंकर,टॅम्पोसह साहित्य केले जप्त

तहसीलदार फसियोद्दीय शेख यांच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टॅंकर,टॅम्पोसह साहित्य केले जप्त
राहुरी तालुक्यातील सात्रळ व चांदेगाव प्रवरा नदीपात्रात तहसीलदार फसियोद्दीय शेख यांच्या विशेष पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टॅंकर,टॅम्पोसह साहित्य जप्त करत धडक कारवाई केल्याने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शनिवारी राञीच्या दरम्यान तहसीलदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू विरोधी पथक गस्त घालत असताना साञळ व चांदेगाव येथील प्रवरा नदीपात्रात वाळूने भरलेला एक टेम्पो, ट्रॅक्टर आणि वाळु काढायचे साहित्य आढळून आले. सदर चालकास परवाना विचाराला असता तो आढळून आला नसल्याने सदर पथकाने या अवैध वाळू वाहतूक आणि उत्खनन करणारे ट्रॅक्टर यारीसह व टेम्पो जप्त केला आहे.
तहसीलदार शेख यांचे मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी दत्तात्रय गोसावी, तलाठी अभिजीत क्षीरसागर, सुनिल गिते, राजेंद्र वराळे, महेश देशमुख, अनिल धुमाळ यांचे पथकाने कारवाई केली.