ब्रेकिंग
abx
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा धुमसत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे दोन्ही राज्यांमध्ये राजकीय तणाव झाला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याचं सांगत महाविकास आघाडीकडून राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून आज खासदार संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे.