अपघात
घोडेगाव येथील 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

घोडेगाव येथील 20 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे वीस वर्षीय गणेश विठ्ठल येळवंडे या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज संध्याकाळी साडेसहा वाजता उघडकीस आला.
घटनेची माहिती कळतच सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व हेड कॉन्स्टेबल गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला व
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गावडे हे करीत आहेत.