आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
तिळापुर जिल्हा परिषद शाळा तसेच वस्ती शाळा वरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
तिळापुर जिल्हा परिषद शाळा तसेच वस्ती शाळा वरती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
राहुरी तालुक्यातील तिळापुर गावांमधील तसेच दोन वस्ती शाळेमध्ये शासनाने नुकतेच आदेश पारित केले होते की मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे त्यानुसार ग्रामपंचायत तिळापुर यांनी तिळापुर मुख्य शाळा व दोन वस्ती शाळा यांना तातडीने निधी उपलब्ध करून कॅमेरे बसवण्यात आले आहे
शासन निर्णय पारित झाल्यानंतर ग्रामपंचायत ने तातडीने कार्यवाही करत शाळेच्या वर्गामध्ये तसेच परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याबद्दल शाळा मुख्याध्यापक रुपनर सर, बोरुडे सर व काकड सर, टाकसाळ सर, जपकर सर ,सरोदे सर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण चोरमले उपाध्यक्ष सौ सीमा आघाव व सर्व सदस्य यांनी ग्रामपंचायत सरपंच बापूसाहेब आघाव उपसरपंच व सदस्य ग्रामविकास अधिकारी यमुल इत्यादींचे यांचे आभार मानले.