अपघात
दुःखद घटना तज्ञ डॉक्टर म्हणून ओळख असलेले सुधाकर उगले यांचे अपघाती निधन.
दुःखद घटना तज्ञ डॉक्टर म्हणून ओळख असलेले सुधाकर उगले यांचे अपघाती निधन.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील तसेच जिल्हाभर प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध डॉक्टर सुधाकर उगले यांचे अपघाती निधन झाले आहे. श्रीरामपूर नेवासा रोड चे काम चालू असून त्या झालेल्या कामावरती दगड ठेवलेले आहेत त्यामध्ये गाडीचे चाक निखळल्याने गाडीवरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन अपघात झाल्याचे समजते अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना नगर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते परंतु उपचार चालू असतानाच त्यांची अखेर आज प्राणज्योत मावळली.
त्यांचा अंतिम विधी पाचेगाव येथे आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.