गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
टाकळीभान येथील गौण खनिज माफीयांना रोखा तहसिलदारांना ग्रामस्थांचे निवेदन
टाकळीभान येथील गौण खनिज माफीयांना रोखा तहसिलदारांना ग्रामस्थांचे निवेदन.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावात सुरु असलेल्या अवैध गौण खनिज व मुरुम वाहतुक थांबविण्यासाठी ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन देवून विनंती केली.
माजी मंञी स्व. खा. गोविंदरावजी आदिक यांच्या संकल्पनेतुन टाकळीभान येथे साकारण्यात आलेल्या गोविंद सागर ( टेल टँक) हा १९७२ साली दुष्काळात लोकांना काम मिळावे म्हणून टेलटँकची उभारणी माजी खा. गोविंदरावजी आदिक यांनी केली. आज त्याची प्रचीती म्हणून आज बारा गावची पिण्याच्या पाणीची पाणी पुरवठा योजना त्याच गोविंद सागरावर अवलंबून आहे.व टाकळीभान व इतर आठ ते नऊ गावे सुजलाम सुफलाम झाले आहे.अशा या गोविंद सागरातुन टाकळीभान येथील मुरुम माफीयांनी टाकळीभान गावात धुमाकुळ घातला आहे. एवढेच नाहीतर यामुळे अनेक प्रकारचे माफीये एकञ येवून गावात राञंदिवस बस स्टँड परीसरात बसुन राहुन अनेकांना अरेरावी करताना दिसून येतात. व संबधित अधिकाऱ्यांना माहीती देऊनही काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे संबधिताना काही चिरी -मिरी घेऊन या राजरोसपणे गौण खनिज व मुरुम वाहतुकी कडे जाणून बुजुन कानाडोळा करत असल्याचे बोलले जात आहे. हे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी ग्रामस्थ एकञ येवून थेट तहसिलदारांनाच निवेदन देऊन हे थांबविण्यासाठी विनती केली आहे.
या अवैध धंद्यामुळे गुंड प्रववृत्तीच्या लोकांचा जास्त प्रमाणात संचार टाकळीभान गावात होत असल्याने गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अवैध धंदे करणारे लोक हे गोविंद सागर तलावाच्या भिंतीवरुन भरदिवसा जड वाहने ने आण करत आहे.त्यामुळे तलावाची भिंत कमकुवत होत चालली आहे.
तलावातील बेसुमार मुरुम उत्खनाने टँक मध्ये मोठ मोठे खंड्डे पडले असुन त्यामुळे त्याठिकाणी अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत .तरीही ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष केल्याने अनेक तरुणानां या मुरुम माफीयामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच महाराष्ट शासनाच्या जमिन अधिनियम व गौण खनिज अधिनियम प्रमाने कार्यवाही करुन हे अवैध धंदे बंद करावे. राॅयल्टीच्या नावाखाली बेसुमार व त्याच्या चार पट मुरुम उचला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व घटनेत एकच ध्यास गावाचा विकास म्हणून स्वःताला मिरवणारे काही राजकीय मंडळी खत पाणी घालत आहे.महाराष्ट्र सरकारने नेमुन दिलेल्या टाकळीभान व परीसरातील प्रशासकीय यंञनेला वांरवार माहीती कळवून देखील कार्यवाही साठी उडवाउडवीची उत्तरे देतात व अवैध रीत्या वाहतुक करत असल्याने वाहन चालक मुरुम घेऊन येणारे वाहन हे रस्ताने सुसाट वेगाने चालवतात या वाहतुकीच्या नादात जर काही अपघात झाला तर अपघाताला कोण जबाबदार राहणार अशा एक ना अनेक प्रश्नातुन गावाला बाहेर काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रकारच्या विंनत्तीचे निवेदन टाकळीभान ग्रामस्थांनी दिले आहे ह्या निवेदनावर । सुंदर रणनवरे,माजी ग्रा.सदस्य आप्पासाहेब रणनवरे,मायकल रणनवरे,शंकर रणनवरे,संदिप रणनवरे,विकास पाटेकर,राजेद्र तडके,दत्ताञय लाड,गणेश भवार,विजय आहेर,गोविंद साबळे,दिपक गुंड,सोमनाथ वेताळ,भानुदास पारे,दत्तु बोरगे,जाँन रणनवरे,सतिष रणनवरे,संदिप शिनगारे,प्रणव अमोलीक,दिपक भुसारीसोमनाथ सदाफळ,दिगबंर रणनवरे,आप्पासाहेब बनकर ,ज्ञानेश्वर सपकळ,निखील गायकवाड,शंकर लाड अदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
Rate this post