एकलव्य आदिवासी युवा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य भिल्ल नाईक वाडा समाज संघटनेच्या कार्यकारिणीला गती.

एकलव्य आदिवासी युवा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य भिल्ल नाईक वाडा समाज संघटनेच्या कार्यकारिणीला गती.
एकलव्य आदिवासी युवा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र नाईक वाडा समाज संघटना नांदेड यवतमाळ यांनी गाव तिथे शाखा तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब आदिवासी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विडा उचललेला आहे याचे औचित्य साधून एकलव्य आदिवासी युवा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य नाईक वाडा समाज संघटना नांदेड यवतमाळ संस्थापक अध्यक्ष संजय तिळेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष लक्ष्मण येनलेवाड सचिव देविदास जानगेवाड कार्याध्यक्ष शिवाजी कोमवाड कोषाध्यक्ष अविनाश रणमले तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर पदाधिकारी यांची नियुक्ती पुढील प्रमाणे केली. पंजाब भाऊ तिळेवाड तालुकाध्यक्ष. गंगाराम पिलवड उपाध्यक्ष. आशुतोष तारमेकवाड सचिव. राजुभाऊ पिटलेवाड मार्गदर्शक. रमेश लांडगे सल्लागार. कैलास जानगेवाड कोषाध्यक्ष. या प्रमाणे करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी बिटरगाव.मण्याली.विडुल.पाटोरी.थेरडी.दराटी.कृष्णापुर.या या गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.