मानोरी वळण रोड खुळे वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी
मानोरी वळण रोड खुळे वस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी
खुळे परिवाराकडून ग्रामपंचायत बॉडीचा सत्कार करण्यात आला राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी वळण रोड खुळे वस्ती यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व तसेच वळण रोड कदम दूध प्लांट ते खुळे वस्ती हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे यामध्ये मानोरी ग्रामपंचायतने 15 वित्त आयोग सन 2020 21 यामधून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला असून थोड्याच दिवसांमध्ये रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मानोरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री मुरलीधर रगड भाऊसाहेब यांनी सत्कार वेळी सांगितले ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचा शाल श्रीफळ देऊन श्री नवनाथ त्रिंबक खुळे मानोरी सोसायटीचे विद्यमान संचालक गोरक्षनाथ त्रिंबक खुळे अशोक त्रिंबक खुळे यांच्याकडून सन्मान करण्यात आला याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य अण्णासाहेब तोडमल शिवाजी थोरात शामराव आढाव मनोज आढाव बापूसाहेब देवकते गोकुळदास आढाव सर पंढरीनाथ चोथे ग्रामविकास अधिकारी रगड भाऊसाहेब ग्रामपंचायत क्लर्क गोरक्षनाथ गुंड पाणीपुरवठा कर्मचारी रोहिदास आढाव व तसेच मनोज खुळे जितेंद्र तनपुरे शरद आढाव अर्जुन पोटे आधी खुळे परिवार उपस्थित होते