गट नंबर 250 मधील अनधिकृत बांधकाम बंद करावे अन्यथा १५ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाचा इशारा…

टाकळीभान येथील गट नंबर 250 मधील अनधिकृत बांधकाम बंद करावे अन्यथा १५ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाचा इशारा…
टाकळीभान येथील शासनाच्या मालकीच्या गट नंबर 250 मधील सुरू असलेले अनाधिकृत बांधकाम बंद करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अर्जदार श्रीमती मंगल रामकृष्ण जाधव यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या या अर्जामध्ये त्यांनी नमूद केले आहे की मौजे टाकळी भान येथील शासनाच्या मालकीच्या गट नंबर 250 मध्ये टाकळीभान पोस्ट ऑफिस समोर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस श्री विठ्ठल श्री हरी कांबळे यांनी आरसीसी पक्के बांधकाम सुरू केलेले आहे, तरी आपण आपल्या स्तरावर सदरचे बांधकाम बंद करावे, यामुळे मौजे टाकळीभान येथे भविष्यात कोणीही शासकीय जागेवर अतिक्रमण करणार नाही.
तरी सदरचे शासकीय जमिनीवर होणारे बांधकाम बंद न झाल्यास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असून, उपोषण करणाऱ्यांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे या अर्जात नमूद केले आहे, या अर्जाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उच्च न्यायालय औरंगाबाद, प्रांत अधिकारी, तहसील कार्यालय, ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत सरपंच/ ग्रामसेवक आदींना दिल्या आहे.