यात्रेची जागा सुरक्षित राहण्यासाठी लोकवर्गणीतून तार कंपाऊंड काम सुरू
यात्रेची जागा सुरक्षित राहण्यासाठी लोकवर्गणीतून तार कंपाऊंड काम सुरू
टाकळीभान प्रतिनिधी – टाकळीभान येथे वाढते अनधिकृत बांधकामाच्या धास्तीने ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून महादेव यात्रेची जागा सुरक्षित राहण्यासाठी, तार कंपाऊंड बांधण्यास सुरुवात ,
टाकळीभान येथे शासकीय जागेवर वाढत्या अतिक्रमणच्या धास्तीने गावातील महादेव यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन महादेव मंदिर यात्रा भरण्याच्या जागेची आखणी करून तार कपाऊंड करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वर्गणी गोळा करून सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे.
गावामध्ये उठ सूट कुणीही शासकीय व ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेमध्ये गाळे बांधत आहेत, अतिक्रमणधारकांना कोणताही धाक राहिला नसून, अतिक्रमणाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. महादेव यात्रेची जागा तरी किमान सुरक्षित रहावी म्हणून, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. व तार कंपाउंड कामास प्रारंभ करण्यात आला आहे. सदर गावामध्ये अतिक्रमणाचे लोन वाढत असताना गावातील पदाधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडे पाहण्याची नागरिकांची दृष्टीकोन बदलला असून , ग्रामस्थांची विश्वासहार्यता उडाली आहे. या घटनांमुळे गावामध्ये सर्वत्र उलट सुलट चर्चा सुरू आहे.