कृषीवार्ता
15 वर्षापासून बंद असलेला रस्ता उपोषणामुळे केला खुला
15 वर्षापासून बंद असलेला रस्ता उपोषणामुळे केला खुला
सोनई, ता. २७ : खरवंडी (ता. नेवासे) येथे १५ वर्षांपासून बंद करण्यात आलेला शेतरस्ता अखेर आज महसूल विभागाच्या प्रयत्नांतून खुला झाला आहे. रस्ता खुला करावा याकरिता कचरू केशव भोगे व योगेश दीनानाथ तिवारी गावात उपोषणास बसले होते.
मंडलाधिकारी फिरोज सय्यद, कामगार तलाठी सोपान गायकवाड व शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे फौजदार डी. वाय. पगारे यांच्या उपस्थितीत यंत्राच्या मदतीने बंद रस्ता खुला करण्यात आला. यावेळी हद्दीतील शेतकरी ज्ञानदेव भोगे व सुनीता खंडागळे उपस्थित होते. पोलिस पाटील संदीप फाटके, माजी सरपंच मुकुंद भोगे, दादासाहेब भोगे, चंद्रकांत फाटके, आबासाहेब फाटके, एम. डी. भोगे, असिफ शेख उपस्थित होते.