ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाने, मागील आठवड्यात ५ बळी तर आठ महिन्यात ४२ बळी.

नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाने, मागील आठवड्यात ५ बळी तर आठ महिन्यात ४२ बळी.

 

आजपर्यंत कित्येक लोकांचे प्राण नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाने घेतले आहे. मागील आठवड्यात ५ बळी तर आठ महिन्यात ४२ बळी ह्या रोडने घेतले तर ४१ जणांचे अवयव निकामी झाले आहेत. आणखी किती बळी हा राष्ट्रीय महामार्ग घेईल सांगता येत नाही. 

 

 

 

हे बळी रोड नि घेतले की सरकारने?हा प्रश्न प्रत्येकाला निर्माण झाला आहे.जास्त प्रमाणात तरुणवर्ग मृत्यूच्या विळख्यात सापडत आहे. मुलगा बाहेर जरी चालला तरी एक अनामिक भीती त्याच्या आईच्या चेहऱ्यावर हिंस्र श्वापदासारखी दबा धरून बसते.  

 

 

 

ज्यानी काळजाचा तुकडा गमावलेला असतो त्यालाच त्याची धग अधिक जाणवत असते बाकीचे नेते, पुढारी श्रद्धांजली वाहून कर्तव्यपूर्तीचे बेगडी समाधान अनुभवते.

 

 

 

नगर जिल्हा सहकाराचा नव्हे तर साखर सम्राटांचा जिल्हा असूनही त्या जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची भयानक दुरव्यवस्था झालेली बघायला मिळते. 

 

 राज्य महामार्गावर नगरपासून तर कोपरगावपर्यंत मंत्री, दोन खासदार , माजी मंत्र्यासह पाच आमदार लाभले आहे तरीही ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही. ह्या रस्त्याचं दुर्दैव्य म्हणावे की जनतेच?

 

 

 

मापक प्रमाणात रोजगार उपलब्ध नसल्याने अनेक तरुण आपला जीव मुठीत धरून नगर एमआयडीसीला कामाला जातात, नाही जाणार तर कुटुंब कस चालवणार?

 

 

 

कधीतरी मेलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन बघा कसा आक्रोश असतो तो; त्याच्या दुःख हे समुद्रात सुद्धा मावत नाही. बोलायला खूप सोपे असते पण ज्याच्या घरात महिलांचे कुंकू पुसत ना त्यांनाचा माहीत असतात वेदना बाकीचे फक्त दोन दिवस शोक व्यक्त करतात आणि आश्वासने देतात.

 

 

 

 आणखी किती कुटुंब उघड्यावर पडणार आहे याचं उत्तर प्रशासनाने द्यावे. हजारो भाविक शिर्डी- शनीशिंगणापूर असा प्रवास करतात राष्ट्रीय महामार्गांने करतात. खराब रस्त्यांमुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो किंवा कधी तर ते आपले प्राण सुद्धा गमवतात. 

 

 

 

नगर-मनमाडच्या दुरवस्थेबाबत अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांची ओरड सुरूच आहे . परंतु राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊनही नगर-मनमाड रस्त्याचे दारिद्र्य कमी होईना झाले.

 

 

 

राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम ज्या कंत्राटदार कंपनीने घेतले होते , त्यांनी ते काम अर्धवट सोडून पळ काढला. अक्षरशः काही ठिकाणचे खड्डे हे मातीने बुजवले आहे आणि डांबरी रोडचे शेतात रुपांतर केले आहे. दुरूस्तीसाठी ८ कोटी निधी मंजूर करण्यात आला असे व्यक्तव्य केले होते. पण अजूनही रस्त्याची अवस्था जशीच्या तशीच आहे.

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावर खड्डे दिसले तर कळवा ३ दिवसात बुजवणार अस व्यक्तव्य माननीय नितीन गडकरी साहेबांनी केलं होतं. तीन वर्षेत नाही झालं ते ३ दिवसात काय होणार हो…माती, दगड व नाममात्र डांबर ओतून ह्या रस्त्याला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असा आव आणला जात आहे.

 

 

 

वास्तव असे की , मेलेल्यांची किंमत मोजली जात आहे आणि सरकार दुर्दैवी घटना म्हणून मोकळे होत आहे. किती दिवस अस चालणार आहे?वृद्ध व्यक्तींना अक्षरशः बसने प्रवास करताना त्रास जाणवत आहे आणि रास्ता खराब असल्यामुळे वेळेचा दुरुउपयोग होत आहे.

 

 

 

नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती, छावा संघटना , मराठा एकीकरण समिती व अन्य सामाजिक संघटना आंदोलनं करून लढा देत आहेत. त्यांना सामान्य नागरिकांनी साथ देऊन मोठी ताकद उभी करणे गरजेचे आहे.

 

 

 

जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर कुणी अपघातात ठार वा जखमी होते तेव्हा केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाची विशेष भूमिका असते तेव्हा घटनात्मक त्रुटी सिद्धांत लागू होतो.

 

 

 

नगर-मनमाड हायवे हा थोडक्यात मृत्यूदूतच बनला आहे. मरणाचा हा सापळा गरीब जनतेची आहुती घेता घेता सर्वांच्या जीवनात दुःख पसरवू लागला आहे. लोकांना आश्वासने देत सुटण्यापेक्षा ते कृतीत उतरवले पाहिजे……

 

 

 

मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻

राहुरी ,अहमदनगर

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे