टाकळीभान गावासाठी पूर्णवेळ तलाठी मिळावा… दाखले मिळण्यासाठी नागरिकांची व विद्यार्थ्यांची फरपट…
टाकळीभान गावासाठी पूर्णवेळ तलाठी मिळावा… दाखले मिळण्यासाठी नागरिकांची व विद्यार्थ्यांची फरपट…
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे आपल्या वेळेत तलाठी उपलब्ध नसल्याने गावातील, तलाठी कार्यालयाशी काम असणारे नागरिक, विद्यार्थी,महिला यांचे मोठे हाल होत असून तलाठी कार्यालय येथे चार दिवसापासून तलाठी हजर नसून नागरिकांच्या तीन- तीन चार- चार चकरा मारून नागरिक वैतागले आहेत. तसेच तलाठ्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने तसेच तलाठी कार्यालय येथे आपल्या वेळेत कुणीही उपस्थित राहत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी शिष्यवृत्तीचे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, शासकीय योजनांचा लाभासाठी आवश्यक असणारे विविध दाखले यासाठी जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती,निराधार महिला , मोठ्या प्रमाणावर टाकळीभान तलाठी कार्यालय समोर जमतात. परंतु कोणी उपस्थित राहत नसल्याने त्यांची घोर निराशा होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की तलाठी एक दोन तास येतात त्यात काहींची काम होतात काही अपूर्ण राहतात. त्यामुळे तलाठी कार्यालयाकडे कामासाठी खूप हेलपाटे मारावे लागतात.तरी टाकळीभान मोठे गाव असून या गावासाठी पूर्ण वेळ कामगार तलाठ्याची आवश्यकता असून, गावासाठी पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रसंगी भाजपचे मुकुंद हापसे, यु टेक चे संचालक केरूबापू मगर,ग्राम. सदस्य भाऊसाहेब पटारे, प्रताप लोखंडे, ऋषीराज हापसे, ज्ञानेश्वर कोकणे,निलेश मगर आदीसह महिला पुरुष नागरिक विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकळीभानच्या बंद तलाठी कार्यालयासमोर विविध दाखले मिळण्यासाठी उपस्थित ज्येष्ठ नागरिक,निराधार महिला, अपंग व्यक्ती, विद्यार्थी यांची गर्दी दिसत आहे.