टाकळीभान येथे श्री संत सावता माळी पुण्यतिथी उत्साहात साजरी…

टाकळीभान येथे श्री संत सावता माळी पुण्यतिथी उत्साहात साजरी…
टाकळीभान: येथील श्री संत सावता महाराज मंदिर येथे श्री संत सावता माळी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महादेव मंदिर ते सावता महाराज मंदिर अशी श्री संत सावता महाराजची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील टाळकरी भजनी मंडळी सह माता भगिनी मोठ्या संख्येने तुळशी कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच गावातील सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. महादेव मंदिराच्या प्रांगणात फुगडी खेळाचा आनंद मोह जोडप्यांना आवरला नाही. तदनंतर ह.भ. प. आरतीताई शिंदे यांचे सुश्राव्य किर्तन सेवा पार पडली. यावेळी ह.भ. प. आरतीताई शिंदे यांचा सत्कार संत सावता महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. व आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले. व तदनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या वेळी मोठ्या संख्येने महिला,पुरुष भाविक भक्त उपस्थित होते