धार्मिकमहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंग्याचे थडगे महाराष्ट्रात;ही हिंदूंसाठी शरमेची बाब-सागर बेग 

छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंग्याचे थडगे महाराष्ट्रात;ही हिंदूंसाठी शरमेची बाब-सागर बेग 

 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- अनन्वित अत्याचार करूनही हिंदू धर्म न सोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारणाऱ्या औरंग्याचे थडगे महाराष्ट्रात आहे ही तमाम हिंदूंसाठी शरमेची बाब असून ते थडगे उखडून फेका अशा मागणीचे टेट्स प्रत्येक हिंदू तरुणांनी आपल्या मोबाईलवर ठेवून तो संदेश शासनापर्यंत कसा जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.औरंग्याच्या थडग्यावर कुत्रंही मुतणार नाही त्यावर काही हिंदू जाऊन माथा टेकवतात असे थडगे उखडून फेकावे लागेल अशी वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना तुमच्या त्या टेट्समुळे बळ येईल तरी त्यांनी ते कार्य नाही केले तर ती मोहीम आम्हालाच फत्ते करावी लागेल अशी गर्जना राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केली आहे.* 

 

             नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथे शिवजयंती उत्सवा निमित्त राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर भैय्या बेग यांची जाहीर धर्मसभा योद्धा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेने आयोजित केली होती त्याप्रसंगी शेकडो शिवप्रेमींसमोर ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी इंद्रजीत चिंधे हे होते.पुढे बोलतांना बेग म्हणाले की,डिजेपुढे अश्लील नाचण्यापेक्षा महाराजांच्या मूर्तीला मनोभावे अभिवादन करा आणि आपल्या महाराजांचा खरा ईतिहास कसा लोकांपर्यंत जाईल त्यासाठी धर्मसभा,व्याख्याने ठेवा जेणेकरून कबरीवर जाऊन माथा टेकवणाऱ्या आपल्याच भरकटलेल्या हिंदुंना आपल्या धर्माचे महत्व कळेल.ज्यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान कसे विसरले जाईल हेच आजपर्यंत काँग्रेस सरकारने पाहिले आहे.खरा ईतिहास लपवुन खोटा ईतिहास सांगणाऱ्या टोळ्या काँग्रेसने पैदा केल्या होत्या त्यामुळे सत्तर वर्षात या अधर्मी जिहाद्यांचे बळ वाढले होते परंतु आता सत्य आणि खरा ईतिहास लोकांपुढे यायला लागला आहे.आपल्याच देवतांच्या मंदिरांवर कब्जे करून त्याला पीर,मजार सारखे थर्डक्लास नावे देऊन हिंदू धर्मावर अतिक्रमण करण्याचे उद्योग पूर्वी झालेत ते आता आपल्याला सगळं पुसायचे आहे.आपल्या पूर्वजांचा रक्तरंजित ईतिहास बघितला तर प्रत्येकांनी आपल्या हिंदू धर्मासाठी खूप मोठा त्याग बलिदान दिलेले आहे.महाराजांच्या सैन्यात कधीही मुसलमान सैनिक नव्हते पण काँग्रेसच्या पैशांवर पोसणाऱ्या ब्रिगेड सारख्या संघटनांनी महाराजांचा खोटा ईतिहास लोकांमध्ये पसरवण्याचे खूप मोठे पाप केले आहे.

 

              माळी चिंचोरा गावातील हिंदूंच्या अंतर्गत वादाचा फायदा उठवत पुरातन गहनीनाथ मंदिराला जिहाद्यांनी गहीबी पीर करून टाकले आणि त्यावर आपलेच हिंदू माथा टेकवतात त्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी बोकड्यांचा बळी देतात हा प्रकार आपल्या जन्मदात्या बापाला सोडून शेजारच्या अब्दुलला बाप म्हंटल्यासारखा असल्याचे सांगून सागर बेग पुढे म्हणाले की,पीर हा नेमका काय प्रकार आहे जरा मोबाईलवरील गुगल वर सर्च करून बघा तुम्हाला त्याबद्दल खरी माहिती मिळेल.आपल्या हिंदूंचे जो मोठ्याप्रमाणात धर्मांतर करेल हिंदूंवर अन्याय अत्याचार करेल तो मेल्यावर त्याचे बांधलेल्या थडग्याला या हिंदू धर्मविरोधी विधर्मी जिहाद्यांनी हिरवी चादर चढवून पीर करून टाकले आणि त्यावर सर्वात जास्त माथा टेकवायला आणि त्यावर पैसे उधळायला बाटलेले हिंदूच जातात.त्यामध्ये आता बदल करण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रत्येक हिंदूंच्या घरा घरात जागृती होणे गरजेचे असल्याचे सागर बेग यांनी यावेळी ठणकावून सांगितले.भारतात दुसरा पाकिस्तान तयार होऊनही वक्फ बोर्डाच्या ताब्यात जमीन शिल्लक राहील एवढ्या मोठ्या भूखंडावर या जिहादी वक्फ बोर्डाचा कब्जा आहे त्यामध्ये दिवसेदिवस वाढ होत असून तो धोका आपल्या घरापर्यंत येऊन ठेपलाय जात पात विसरून केवळ हिंदू म्हणून एकजूट राहिल्यावरच येणारे हे संकट थांबणार आहे अन्यथा आपला विनाश अटल असल्याचे सागर बेग यावेळी निक्षून सांगितले.

 

                       भाजपायुमोचे नेवासा तालुकाध्यक्ष प्रतापराजे चिंधे यांचेही याप्रसंगी प्रास्ताविक भाषण झाले.माळी चिंचोरा गावातील योद्धा प्रतिष्ठानचे अजिंक्य रक्ताटे,सागर चिंधे,सार्थक चिंधे, सुदर्शन चिंधे,विजय धानापुणे,वैभव देव्हारे तसेच पुरुषोत्तम चिंधे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक अशोक गाढे सर यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बसलेले काही सहकार क्षेत्रात व सरकारी नोकरी करणाऱ्यांना धर्मरक्षक सागर बेग यांच्या घाणाघाती भाषणाने काहीकाळ भीती वाटली होती…ईतकी भीती काँग्रेसने नोकरदार वर्गात सेक्युलॅरिझम च्या नावाखाली भरून ठेवलीय की सत्यता मांडणाऱ्या व्यासपीठावर बसायला नोकरदार सुद्धा घाबरला पाहिजे याची प्रचिती पत्रकारांना यावेळी आली.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे