टाकळीभान येथे आगामी काळात होत असलेल्या शिवजयंती उत्सव, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, व महादेव यात्रा उत्सव लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिताचे नियम पाळून साजरे करावेत -पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
टाकळीभान येथे आगामी काळात होत असलेल्या शिवजयंती उत्सव, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, व महादेव यात्रा उत्सव लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिताचे नियम पाळून साजरे करावेत -पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
टाकळीभान प्रतिनिधी – टाकळीभान येथे आगामी काळात होत असलेल्या शिवजयंती उत्सव, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, व महादेव यात्रा उत्सव लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिताचे नियम पाळून साजरे करावेत असे आवाहन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले
टाकळीभान येथे पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती त्यावेळी चौधरी बोलत होते. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस सुप्रियाताई धुमाळ ,उपसरपंच कान्हा खंडागळे, रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक कार्लस साठे आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून याच आचारसंहितेच्या काळात शिवजयंती उत्सव,रमजान ईद डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महादेव यात्रा उत्सव आदि उत्सव येत असल्याने त्या निमित्ताने कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाही, कोणत्याही राजकीय नेत्यांचे फ्लेक्स बोर्ड लावता येणार नाही, मात्र या काळात धार्मिक कार्यक्रम घेता येतील परंतु ते साजरे करत असताना त्याचेही वेळेचे नियम असणार आहे. टाकळीभान गावाने पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्य करीत आले असून येथून पुढेही तुमचे आम्हाला सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे भावनिक आवाहन चौधरी यांनी केले,
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे यांनी टाकळीभान गावची लोकसंख्या जवळपास 28 हजारा पर्यंत आहे, राज्यमार्ग 44 असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आह, बाजारपेठ मोठी असल्याने, पोलीस दूर क्षेत्राला कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी ठेवण्याची मागणी केली,
याप्रसंगी नरहरी सोनाराचे नेते मधुकर मॅडम ,भैया पठाण, जामा मशीदचे ट्रस्ट देशमुख अब्दुल हमीद, अनिश मौलाना हा अभिजीत लेलकर, पांडे काका, अक्षय कोकणे रिपाईचे ज्येष्ठ नेते शामराव खरात,रवींद्र भालसिंग, सुरेश गायकवाड, गोपीनेचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे ,बाबा सय्यद ,आदि कार्यकर्ते उपस्थित होते ,
.