पोलीस व्हॅन ची बैलगाडीला धडक*
शनिशिंगणापूर रोडवरील घटना,दोन जण जखमी,एका बाळाचा समावेश, अपघाताची नोंद नाही.
*पोलीस व्हॅन ची बैलगाडीला धडक*
शनिशिंगणापूर रोडवरील घटना,दोन जण जखमी,एका बाळाचा समावेश, अपघाताची नोंद नाही.
सोनई–शनिशिंगणापूर -सोनई रोडवर बुधवारी पहाटे ( दि.४ रोजी) ५.४० च्या सुमारास शनिशिंगणापूर हुन सोनाईकडे येणाऱ्या पोलीस व्हॅन ने ऊस तोडीस जाणाऱ्या मोकळ्या बैलगाडीला पाठीमाघून जोराची धडक देऊन अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एक महिला व तान्हुल बाळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ शनिशिंगणापूर कार्यस्थळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या बाबत माहिती की,रात्री एम.एच.१६ N ५१९ ही पोलीस व्हॅन शनिशिंगणापूर हुन सोनई कडे येत असताना कमानी जवळ ऊस तोडणी साठी चाललेल्या रिकाम्या बैलगाडीला पाठीमाघून जोराची धडक देऊन बैलगाडीचे एक्सल तुटून गाडीची मोडतोड झाली आहे. बैलगाडीत असलेल्या महिला व त्यांचे लहान बाळ यामध्ये जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मात्र या घटनेची अपघाती नोंद करण्यात आली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात सोनई ठाण्याशी चौकशी केली असता या घटनेची खबर व अपघाती नोंद नसल्याचे सांगितले.