ब्रेकिंग

बीडमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन; ६०० हून अधिक पत्रकारांची उपस्थिती

व्हॉईस ऑफ मीडियामुळे पत्रकारांना अच्छे दिन येतील : खासदार इम्तियाज जलील

बीडमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन; ६०० हून अधिक पत्रकारांची उपस्थिती

 

देशभरात व्हॉईस मीडियामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य याकडे लक्ष दिले जातेय. व्हॉईस ऑफ मीडियाचे नेतृत्व करणारी फळी पाहता पत्रकारांचे देखील अच्छे दिन येतील, असा विश्वास निर्माण झाला आहे, असे मत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

बीड येथील वैष्णो पॅलेस येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनाचे उद्घाटन खासदार डॉ.प्रितम मुंडे, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हस्ते रविवारी (दि.३०) झाले. उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील आदी उपस्थित होते.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, पंतप्रधानांनी देशात अच्छे दिन येतील असे सांगितले आहे. परंतु कधी येतील हे ठाऊक नाही, असे असले तरी पत्रकारांचे अच्छे दिन येतील असा मला आज विश्वास निर्माण झाला आहे. मन की बात करणाऱ्यांनी कधीतरी पत्रकारांची मन की बात ऐकावी. एका वृत्त समूहाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी तरुण पत्रकारांमध्ये आग आहे, परंतु मालक विकले गेले आहेत असे वक्तव्य केले. त्या वक्तव्याशी आपण सहमत आहे. देशात विरोधक आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जाणारा मीडिया नको असेल तर लोकशाही कमजोर होईल. तसेच, आता पत्रकारही इमानदारीने पत्रकारिता करतील का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पैसे फेकून मोठमोठी वृत्तसमूह खरेदी करण्याचा घाट उद्योगपतींनी घातला आहे. अलीकडे टीव्हीवरील राजकीय गोंधळाला प्रेक्षक कंटाळले आहेत. मी पत्रकारिता करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एका स्टोरीसाठी चॅनलने मला १५ दिवस कामाला लावले होते. त्यावेळी मी कांदा उत्पादकांची व्यथा मांडली. आज सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याकडे मीडियाने लक्ष वेधले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मला आमंत्रण देतानाच पत्रकार म्हणून बोलावले जात आहे, असे आवर्जून सांगितले. त्यामुळे मी आपणास सांगू इच्छितो की, माझ्या २४ वर्षातील पत्रकारितेमुळेच नंतरची ९ वर्षीय राजकीय कारकीर्द यशस्वीपणे पार पडली आहे. पुढे बोलताना त्यांनी लोकशाहीने ज्यांच्या हातात सर्वाधिकार दिले, अशा लोकप्रतिनिधींच्या साक्षरतेबाबतही भाष्य केले. बीड जिल्ह्याकहे भूमिपुत्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यातऐवजी शाळा अथवा दवाखाना उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. स्मारकाच्या ठिकाणी आता दवाखाना होत असून त्याला मुंडे यांचे नाव देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याची माहिती दिली. अलीकडे पत्रकारांची संख्या खूप वाढली आहे. पत्रकारिता ही दुकानदारी झाली आहे, हे चित्र बदलण्याचे आव्हान आहे. त्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया प्रयत्नशील आहे, हे पाहून आनंद वाटला. आगामी काळात राजकारणात अपयश आल्यास व्हॉईस ऑफ मीडियाचा पदाधिकारी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या साक्षीने संदीप काळे यांनी पत्रकारांना शपथ दिली. तत्पूर्वी ज्येष्ठ आणि यशस्वी पत्रकारांचे सत्कार करण्यात आले. पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. उदघाटन सत्राचे प्रास्ताविक संजय मालाणी यांनी केले. सूत्रसंचलन अमोल मुळे, गणेश सावंत, व्याख्याते यांनी केले. आभार राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांनी मानले.

पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध -खा.डॉ.प्रीतम मुंडे

राजकारणात मीडियाला टाळून काहीही होत नाही.माझे मीडियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आपण राजकीय आयुष्यात कधीही नकारात्मक बातमी दिली अथवा पेरली नाही. बीडच्या मीडियाशी ऋणानुबंध आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशन होत आहे. या अधिवेशनातून प्रश्न सुटतील. ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे, अशी ग्वाही खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, डिजिटल क्रांती झाली असली तरी प्रिंट मीडियावर माझा अजूनही विश्वास आहे. परंतु ब्रेकिंग न्यूजचा काळ असल्याने नवं तंत्रज्ञानाचे बदल स्वीकारावे लागतील. मंचावर पुस्तक देऊन स्वागत हा उपक्रम अनुकरणीय आहे. समाजात ज्या घटना घडतात त्याचे चित्रिकरण होणारच, परंतु सनसनाटी वृत्त टाळणे काळाची गरज आहे, असे सांगून त्यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे