शेतामध्ये काढून पडलेल्या कांद्याचे नुकसान पंचनामे करून मदत होण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक.

शेतामध्ये काढून पडलेल्या कांद्याचे नुकसान पंचनामे करून मदत होण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक.
सहा महिने शेतकऱ्यांचे कष्टाचे कांद्याने केले वांधे
नगर जिल्ह्यात नेवासा राहुरी श्रीरामपूर भागामध्ये जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचे अति प्रमाणात नुकसानी झाले आहेत. अवकाळी पावसाची उघड झाल्याने शेतातील कांदा काढण्यासाठी मजूर मिळत नसताना देखील शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा भाव देऊन कांदा काढलेला आहे. एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च चार महिने रात्रीचा दिवस करून कांदा पिकाला जपले व अवकाळी पावसामध्ये किंवा त्याआधी काढलेला कांदा शेतामध्ये ओळी लावून ठेवल्या त्या ओळी झाकण्यासाठी प्लास्टिक बारदान टाकून झाकण्यात आली. परंतु निसर्ग शेतकऱ्यावर कोपल्यागत अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा काढून ठेवलेला कांदा ओळीमध्ये सोडून गेल्याने शेतकऱ्याचे अतिशय नुकसान झाले आहे हजारो रुपये खर्च करून आणलेले पीक डोळ्या समोर सोडून जाताना शेतकरी राजा पाहत आहे. व्यापारी वर्ग अडवणूक केल्यासारखं कवडीमोल भावाने मागत असल्याकारणाने शेतकऱ्याने एक रुपया खर्च केलेला असताना 25 पैसे सुद्धा होत नाही या कारणाने शेतकऱ्याची तोंडची भाकर तुटलेली आहे ज्या शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्ये सडत आहे अशा शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांनी याच पिकावर मुलांचे शिक्षण तसेच पुढील कापूस पिकासाठी लागणारा खर्च भागवण्याचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न भंगले आहे याबाबत लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी वर्गाने तात्काळ पावले उचलावी व पुढील पिकासाठी शेतकऱ्यांना उभारी द्यावी अशी शेतकऱ्यांची आर्त हाक राज्य कर्त्यांना आहे.
नुकत्याच नव्याने मार्केट कमिटी निवडणुका पूर्ण झालेल्या असून नवीन निर्वाचित संचालकांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत तसेच आत्ता नुकसानी झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी मिळेल याकडे लक्ष घालण्याची गरज आहे आत्ताच याबाबत बोलणे उचित नसून हे नवनिर्वाचित संचालक काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अखिल भारतीय मानवाधिकार मिशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष
श्री धनंजय माने