येणा-या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या माध्यमातून आपण पर्यावरण पूरक जीवन अवलंबिले
येणा-या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या माध्यमातून आपण पर्यावरण पूरक जीवन अवलंबिले
येणा-या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताच्या माध्यमातून आपण पर्यावरण पूरक जीवन अवलंबिले पाहिजे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडत चाललेले आहे. वातावरणातील बदल आपण सध्या अनुभवत आहे देश पातळीवर हरित ऊर्जेकडे कल वाढत असताना वैयक्तिक स्तरावर देखील आपण ऊर्जेचा वापर करायला हवा असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांनी केले.
राहुरी शहरातील स्टेशनरोड परीसरात पांडुरंग लॉन्स च्या समोर मानोरी येथील उद्योजक गोविंद आढाव यांचे कमलेश्वर या नामांकित कंपनीचे कार्तिक सोलर या दालनाचा आ.प्राजक्त तनपुरेंच्या हस्ते संपन्न झाला आहे. यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुण उद्योजक राहुरी सारख्या शहरी भागात येऊन सध्याच्या युगाचा आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले सौर ऊर्जा वरील यंत्रसामुग्री चा व्यवसाय करत आहे त्यामध्ये सोलर वॉटर हीटर कृषी पंप सोलर होम लाईट सिस्टम सोलर स्ट्रीट लाईट सिस्टम व्यवसाय त्यांना भरभराटी व त्यांची उत्तम उत्तम प्रगती होऊ असे देखील शुभेच्छा तनपुरेंनी दिल्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.संभुगिरी महाराज गोसावी होते. तर प्रमुख उपस्थितीत मानोरी सोसायटीचे माजी चेअरमन दगडू पाटील पोटे, भारत शेठ भुजाडी, ह.भ.प. किशोर महाराज जाधव, तंटामुक्ती माजी अध्यक्ष बाजीराव आढाव, माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच अब्बास भाई शेख दयावान, तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, संचालक रविंद्र म्हसे, संचालक निवृत्ती आढाव, माजी उपसरपंच डॉक्टर राजेंद्र पोटे, राहणे पाटील लॉन्स चे मालक महेश पाटील राहणे, पोलीस पाटील भाऊराव आढाव, विश्वधन मल्टीपर्पज निधी लिमिटेड चेअरमन संदीप आढाव, स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय तनपुरे, माजी सैनिक चांदभाई पठाण, विठ्ठल हरिचंद्रे, पडघलमल सर, राजेंद्र पटेकर सर माजी उपसरपंच अण्णासाहेब तोडमल, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य बाबासाहेब आढाव, पाणी वापर संस्थेचे संचालक बाळासाहेब पोटे, पाणी वापर संस्थेचे संचालक नारायण आढाव, बापूसाहेब आढाव, मनोज खुळे अर्जुन पोटे गंगाधर बाचकर बापूसाहेब डोंगरे सचिन भाऊ झिंज योगेश गायकवाड किशोर पवार, झाकीर पठाण, अशोक पाटील आढाव, ज्ञानदेव थोरात, बाबासाहेब कांबळे, अमोल भिंगारे, किशोर आढाव, किरण भिंगारे, गोटीराम आढाव, कार्तिक सोलर राहुरी स्टाफ जोशीसाहेब, भाऊसाहेब वने, मनोज जोशी, संदीप भालेराव, किशोर जोशी, अनिता चौथे, कमलेश्वर सोलर कंपनीचे मॅनेजर संदि प नरोडे तसेच मिञ परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले व तसेच सर्वांचे आभार भाऊसाहेब पाटील आढाव यांनी मांडले