नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱी टोळी गजाआड, सैराट चित्रपटातील प्रिन्स पोलिसाच्या रडारवर, निर्माता/दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या नावाचा देखील आरोपींनी केला वापर!
नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱी टोळी गजाआड, सैराट चित्रपटातील प्रिन्स पोलिसाच्या रडारवर, निर्माता/दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या नावाचा देखील आरोपींनी केला वापर!
मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं दाखवून तरुणांना लाखों रूपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केलाय….. विशेष म्हणजे लोकप्रिय मराठी सैराट चित्रपटातील प्रिंची भूमिका साकारणारा सुरज पवार देखील यामध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने आता सुरज पवार राहुरी पोलिसांच्या आधारावर असून यामध्ये प्रसिद्ध निर्माते नागराज मंजुळे यांच्या नावाचा देखील आरोपींनी वापर केल्याने या गुन्ह्यामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला….,,समोरची व्यक्ती म्हणाला की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलतोय आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल. तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे, रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली…..,, तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे असे लक्षात आल्याने रक्कम देण्याचे टाळले व आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आले की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात
नसल्याचे समोर आलं….,,,आणि पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये बनावट शिक्के व शासकीय हुबेहूब कागदपत्रे या आरोपींनी बनवले होते आता यामधील दत्तात्रय अरूण शिरसागर, आकाश विष्णु शिंदे,ओमकार नंदकुमार तरटे, सर्व राहणार ता. संगमनेर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यामध्ये सैराट चित्रपटातील प्रिंची भूमिका साकारणारा सुरज पवारचा देखील सहभाग असल्याचं काही आरोपींकडून सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले यामध्ये खुद्द नागराज मंजुळे यांचा देखील उल्लेख झाल्याने तपासाची दिशा आता काय वळण घेणार, हे बघावं लागणारं आहे.
पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नऱ्हेडा करत आहे.