आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
जि.प्र शाळे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घर घर तिरंगा अभियान संपन्न
बाभुळगाव जि.प्र शाळे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घर घर तिरंगा अभियान संपन्न
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव जि.प्र शाळेमध्ये 75 वा स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सव साजरा करण्यात आला. जि.प्र शाळा ते बाभुळगाव भव्य तिरंगा रॅली प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत त्यांच्या हाती अभियानाचा भारतीय तिरंगा आणि मुखी घर घर तिरंगा,भारत माता की जय,वंदे मातरम आणि जय जवान जय कीसान या घोषणांनी बाभुळगाव देशप्रेमात न्हावुन निघाला या मध्ये नागरीकांची वाहवा मिळाली या मध्ये बाभुळगावची शान मेजर संदीप वाघमारे,अमोल थोरात,हरीचंद्रे यांची साथ लाभली.जि.प्र शाळेचे शिक्षक वृंद यांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले या वेळी अशोक उंडे,तुकाराम पाटोळे,रामदास कोतकर,हरीभाऊ पाटोळे,गोरक्षनाथ तमनर,अॅड कचरु चितळकर,रामदास माने, आदी ग्रामस्थ सहभागी होते