ब्रेकिंग
मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी टाकळीभान येथून 50 चार चाकी वाहनांचा ताफा आंतरवाली सराटा येथे रवाना

मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी टाकळीभान येथून 50 चार चाकी वाहनांचा ताफा आंतरवाली सराटा येथे रवाना
मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व प्रत्यक्ष भेटण्यासाठी घेण्यासाठी टाकळीभान येथून सकल मराठा समाज च्या वतीने 50 चार चाकी वाहनांचा ताफा आंतरवाली सराटा येथे रवाना
19 फेब्रुवारी 2024 रोजी टाकळीभान स्टँड परिसरात सर्व समाज बांधवांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ठिक 10 वाजता विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शिव बालकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे शिवपूजन करून आरती करण्यात आली.
शिवजयंतीचे औचित्य साधून टाकळीभान येथून 50 चार चाकी वाहनांचा ताफा आंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी सर्व सकल मराठा समाज बांधव ढोल ताशांच्या, फटाक्याची आतिषबाजी करून व शिवगर्जना करत टाकळीभान येथून सराटीला नुकताच रवाना झाला आहे. मनोज जरांगे यांची भेट घेऊन सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज( रायगड) यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे