केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतले शनी दर्शन
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतले शनी दर्शन
सोनई/ केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिशिंगणापूर येथे येऊन आपल्या कुटुंबीयासमवेत शनि महाराजाचे दर्शन घेतले यावेळी नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लघे पाटील शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर उपाध्यक्ष विकास बानकर देवस्थानचे विश्वस्त पोपटराव शेटे शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील एडवोकेट सयाराम पाटील बानकर भारतीय जनता पक्षाचे सुभाष पवार, सतीश कर्डिले अधिक कार्यकर्ते उपस्थित होते शिवराज सिंह चौहान हे दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानला येत असतात यावेळी ते आपल्या कुटुंबीया समावेश शनिशिंगणापूरला येऊन अभिषेक व शनी चौथ्यावर जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले शिवराज सिंह चौहान हे गेल्या 18 वर्षापासून न चुकता वर्षाच्या सुरुवातीलाच शनिशिंगणापूरला येत असतात मात्र यावेळी नियोजित कार्यक्रमामुळे ते एक दिवस उशिराने आले यावेळी त्यांच्या समावेत त्यांची पत्नी चिरंजीव कुणाल आधी परिवारातील सदस्य उपस्थित होते महाराजाचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळते हे त्यांनी सांगितले आपण न चुकता वर्षाच्या सुरुवातीलाच शिर्डी येथे मुक्कामी येऊन दुसऱ्या दिवशी शनिशिंगणापूरला येत असतो मात्र नियोजित कार्यक्रमामुळे यावर्षी एक दिवस उशिरा यावे लागते यावेळी देवस्थानच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर उपाध्यक्ष विकास बानकर पोपटराव शेटे एडवोकेट साईराम बांधकर यांनी त्यांचा शनि प्रतिमा श्रीफळ देऊन सन्मान केला
मध्यप्रदेशचे माझी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषी मंत्री यांनी सोनई येथील सुप्रसिद्ध अशोका वडा-पावचा घेतला अस्वाद…
शिर्डीला जाताना त्यांनी सोनईचा वडा-पावअस्वाद घेतला.
सन २००० साला पासून केंद्रीय कृषिमंत्री चौहान हे दरवर्षी न चुकता एक जानेवारीला शनिशिंगणापुरला येत आहेत.शिर्डीला जाताना चौहान व परिवाराने अशोका वडापावच्या हातगाडीवर थांबून वडा-पावचा आस्वाद घेतला. अशोक कुसळकर व संदीप कुसळकर यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी उपसरपंच नंदिनी संदीप कुसळकर, अंजली कुसळकर, कल्पना कुसळकर, मोनिका कुसळकर केंद्रीय कृषिमंत्र्याचे सह पत्नीक औक्षण केलं. यावेळी कुसळकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.या समवेत पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी शनिशिंगणापूरचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व कर्मचारी यांनी दोन्ही ठिकाणी गर्दी व वाहतूकीचे चोख बंदोबस्त ठेवला..