नोकरी
पवन वैराळ याची आरोग्य सेवकपदी निवड
पवन वैराळ याची आरोग्य सेवकपदी निवड
टाकळीभान प्रतिनिधी : अशोकनगर येथील पवन वैराळ याची पालघर येथे आरोग्य सेवकपदी निवड झाल्याबद्दल रामराव आदीक पब्लिक स्कुलच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रभारी प्राचार्य प्रसाद मुंडलिक, प्रतिभा आढाव, अर्चना सातदिवे, नगमा शेख, गितांजली ताके ऋतुजा माळी ऋतुजा गोरे ,वडील दिलीप वैराळ उपस्थित होते मागीलवर्षीच त्याचा मोठा भाऊ वैभव वैराळ
याची मध्य रेल्वेत निवड झाली आहे पवन याच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अविनाश आदीक ,प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदीक, फिरोज पठाण सर यांनी त्याचे कौतुक केले .