क्रिडा व मनोरंजन
डॉ. निखिल उगले यांना श्रीरामपूर IMA आयोजित जलतरण स्पर्धेत कास्य पदक

डॉ. निखिल उगले यांना श्रीरामपूर IMA आयोजित जलतरण स्पर्धेत कास्य पदक :-
दिनांक २०/९/२६ रोजी श्रीरामपूर सायकलिंग क्लब आयोजित व IMA श्रीरामपूर यांच्या साथीने. जलतरण स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. निखिल उगले यांना वयोगट ३६ ते ४० यामध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल मध्ये कास्यपदक मिळाले. या स्पर्धेसाठी त्यांना त्यांचे आजोबा डॉ. रामनाथ उगले, आई सिंधू उगले , पत्नी तन्वी उगले,चुलते दिलीप उगले, सासरे विठ्ठलराव गुंजाळ, मामा कारभारी कान्हे, युवा परिवर्तन पॅनल पाचेगाव व तसेच सर्व ग्रामस्थ पाचेगाव यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.



