गुन्हेगारी

नेवासा येथे लव जिहाद प्रकार उघड

हिंदू अल्पवयीन मुलीला लग्नासाठी धमकी

नेवासा येथे लव जिहाद प्रकार उघड.

हिंदू अल्पवयीन मुलीला लग्नासाठी धमकी

नेवासा शहरात एका अल्पवयीन हिंदू मुलीवर झालेल्या अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. गल्लीतीलच राहणारा एका नराधमाने घरात घुसून मुलीचा विनयभंग तर केलाच पण “गजवा ये हिंद माझे टार्गेट” आहे असे म्हणत पीडीतेला लग्नासाठी धमकावल्याची घटनेला लव जिहाद गंभीर प्रकार असल्याचे समोर येत आहे.

पीडितेच्या घरी दिनांक 21 एप्रिल रोजी, दुपारी तीन वाजता सुमारास पीडित मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून, यावेळी आदिल आयुब सय्यद राहणार नेवासा याने बेल वाजवून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. आरोपीने पीडितेशी अश्लील चाळे करून तिला मिठीत ओढले आणि लग्नासाठी पळवून नेण्याचा प्रयत्न केला.  आरोपीने तिला तू माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या घरच्यांना संपवून टाकीन, अशी उघड धमकी दिली.एका तेरा वर्षीय मुलीला अशा प्रकारे धाक दाखवणे हे मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

पीडीतीची आई लग्नावरून घरी परतली असताना मुलीचा आरडा ओरडा ऐकून त्यांनी तात्काळ मुलीच्या मामाला मदतीला बोलावले आरोपीने स्वतःला आतून कोंडून घेतले होते. मात्र नातेवाईकांनी प्रसंगावधान राखून युक्तीने दरवाजा उघडायला लावला. दरवाजा उघढताच आरोपीने मामाला धक्का देऊन तिथून पळ काढला. मुजोर आरोपीने जाताना धमकी दिली की,  तुमचे जगणे मुश्किल करून टाकीन. यामुळे या लव जिहाद प्रकरणात पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी आदिल शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर पोस्को, विनयभंग ,लैंगिक छळ, अनधिकृत प्रवेश आणि जीवे मारण्याची धमकी या व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत .या घटनेमुळे नेवासा येथील हिंदू संघटना आणि स्थानिक नागरिकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे