गुन्हेगारी
जामखेड येथे गोळीबार करून पसार झालेला ‘तो’ कुख्यात आरोपीच चिंग्या मोरे अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद

जामखेड येथे गोळीबार करून पसार झालेला ‘तो’ कुख्यात आरोपीच चिंग्या मोरे अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद
जामखेड येथील न्यू कावेरी हॉटेलमध्ये झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याला अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.अनेक महिन्यांपासून फरार असलेला हा आरोपी खर्डा परिसरात आल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, रोहित अनिल पवार (वय 29, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) हे 18 डिसेंबर 2025 रोजी बीड रोडवरील न्यू कावेरी हॉटेलमध्ये असताना आरोपी शुभम शहाराम लोखंडे,उल्हास विलास माने उर्फ वस्ताद,अक्षय उर्फ चिंग्या मोरे, अर्शद अमीन सय्यद तसेच 6 ते 7 अनोळखी साथीदारांनी एकत्र येत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.या वेळी आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करून पवार यांना गंभीर जखमी केले.



