कापूस हमीभावाने खरेदी करण्यात यावी रवींद्र मोरे सह शेतकऱ्यांची मागणी

कापूस हमीभावाने खरेदी करण्यात यावी रवींद्र मोरे सह शेतकऱ्यांची मागणी
राहुरी- राहुरी तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, कापूस हमीभावापेक्षा कमी रुपयांनी खरेदी करून शेतकऱ्यांची लूट होत आहे. शासनाने योग्य ती कारवाई करून सर्वांचे काटे तपासावे व हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी होत असलेल्या कापसाची खरेदी थांबवावी. यासाठी आज राहुरी तहसील येथे निवेदन देण्यात आले.
पावसाळा सुरू होण्याअगोदर मे महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली परंतु एन काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.
राहिलेले जेमतेम पिकाची काढणी काढण्यासाठी मजूर मिळण्याचे झाले. मिळालेच तर कापूस वेचणी दर 15 ते 20 रुपये किलो प्रमाणे झाला आणि कापूस विक्री पाच ते सात हजाराने होत असल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले.
कापूस खरेदी केंद्र चालक शेतकरी ते जिनिंग मधले एजंट यांनी शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजार समितीमध्ये कापूस दर भारतीय कापूस महामंडळाने(CCI) जाहीर केल्याप्रमाणे 8100 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने आहे. तरी अनेक व्यापारी शेतकऱ्यांपासून कापसाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात केली जात आहे. याशिवाय व्यापारी एक ते दोन किलोपर्यंत कपात करत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच अतिवृष्टी, वाढलेला उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून होत असलेला हा अन्याय तातडीने थांबवणे आवश्यक आहे. असे रवींद्र मोरे व शेतकरी यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी नेते रविद्रं मोरे, कोपरे रामभाऊ जगताप, साहेबराव जगताप, जगन्नाथ जगताप, दत्तु जगताप, जैमिनी जाधव, केशव जगताप, वांजोळपोई सचीन पवार, गोरक्षनाथ पवार, आप्पासाहेब पवार, शेनवडगाव किशोर जाधव, सौरभ जाधव, मोहन जाधव ,माऊली जाधव आदी उपस्थित होते.



