कृषीवार्ताब्रेकिंग
वांगी बुद्रुक व परिसरामध्ये हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
वांगी बुद्रुक व परिसरामध्ये हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक ,खु//खिर्डी, गुजरवाडी, टाकळीभान परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. आणि शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या पाळीव कुत्रे यांच्यावर हल्ली होऊन मृत्युमुखी पडत आहे. वन विभागाचे याकडे दुर्लक्ष असून वन विभागाने तात्काळ या संदर्भात कार्यवाही करायला पाहिजे .
सध्याला पावसाचे दिवस असून वीस पुरवठा केव्हाही खंडित होत आहे. त्यामुळे कुठलीही जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक, खुर्द, खिर्डी गुजरवाडी, कारेगाव तसेच टाकळीभान परिसरामध्ये जिथे जास्त प्रमाणात बिबट्याचा वावर होत आहे तिथे पिंजरे लावण्यात यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे