आठरा गाव पाणी योजनेला ठिक ठिकाणी गळती प्रशासनाचे दुर्लक्ष
आठरा गाव पाणी योजनेला ठिक ठिकाणी गळती प्रशासनाचे दुर्लक्ष
सोनई सह अठरा गाव पाणी योजना मोठा गाजावाजा करुन सुरू करण्यात आली मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या ठिक ठिकाणी गळती लागली असुन त्यामुळे पुढे पाणी जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत मात्र या योजनेच्या देखभालीसाठी नेमलेल्या कडून जाणुन बुजुन दुर्लक्षामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. या सविस्तर माहिती अशी कि सोनई येथील मुळा पब्लिक स्कूल पासुन खेडले परमानंद पानेगाव आदी गावांसाठी पाईप लाईन ठाकलेली आहे मात्र फार्मसी कॉलेज जवळ एका कुटुंबाने या लाईनला होल पाडलयानै यातुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे एक वर्षा पासुन हा प्रकार सुरू आहे या लाईनची देखभालीसाठी नेमलेल्या माणसांकडून या कडे जाणुन बुजुन दुर्लक्षामुळे पुढील गावे पाण्यापासून वंचित राहत आहेत याची जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे ऐन उन्हाळ्यात गगथडी गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे