पोहोण्यास गेलेल्या तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू

पोहोण्यास गेलेल्या तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू
प्रवरा नदीपात्रात पोहोण्यास गेलेल्या इसमाचा नदीत बुडून मृत्यू झाला असुन दोन दिवसापासुन शोध मोहीम सुरु होती आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला बेलापुर रामगड येथील जावेद इर्शादअली सय्यद वय ४० वर्ष हा बेलापुर खूर्द येथील प्रवरा तिरावर गाडी धुण्याकरीता आला होता गाडी धुतल्यानंतर त्याला प्रवरानदी पात्रात पोहोण्याचा मोह आवरता आला नाही तो बेलापुर खूर्दच्या नावघाटावरुन पोहोत प्रवरा नदीच्या मध्यावर आला परतु त्याचा दम तुटल्यामुळे तो नदीत बुडाला बऱ्याच वेळाने संबधीत इसम बुडाल्याचे लक्षात आले आन शोध मोहीम सुरु करण्यात आली रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली गावातील पट्टीचे पोहणारे तसेच अग्नीशामक दलाचे अधिकारी हेमंत कारले हे सात जणांच्या टिमसह तेथे पोहोचले श्रीरामपुरचे तहसीलदार राजेंद्र वाकचौरे मंडलाधिकारी सारिका वांडेकर बेलापुर खूर्दचे कामगार तलाठी शिंदे घटनास्थळी ठाण मांडून होते .गावातील पोहणारे तसेच अग्नीशामक दलाचे जवान यांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी अकरा वाजता त्याचे प्रेत प्रवरा नदीत सापडले त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले शोकाकूल वातावरणात त्याचा दफनविधी करण्यात आला त्याच्या पश्चात आई वडील तिन भाऊ भावजयी पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे