भेर्डापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार व कल्याणकारी योजनेंतर्गत
“मध्यान्ह भोजन योजनेचा” शुभारंभ व ई श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकूटे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
आज दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ रोजी भेर्डापूर गावात लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव पा दांगट होते.
यावेळी अशोकचे माजी चेअरमन भाऊसाहेब पा कहांडळ, अशोकचे विदयमान संचालक प्रफुल्ल पा दांगट, संचालक योगेश विटनोर, कामगार संचालक अशोक पारखे, ज्यांच्या सहकार्याने ही योजना सध्या संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात राबवली जात आहे असे कामगार नेते गणेश छल्लारे, भेर्डापूरचे विद्यमान सरपंच सौ अनिताताई कांदळकर, उपसरपंच प्रताप कवडे, गोकूळ काळे, पत्रकार दत्ता जानराव, संजय कवडे, दादा पाटील कवडे, प्रकाश शिवरकर, बाबासाहेब पवार सर, लक्ष्मण कसबे सर, रामनाथ कवडे, महेश पटारे, ग्रामपंचायत सदस्य अनिल दांगट, श्रीकांत दांगट, शशिकांत दांगट, आण्णासाहेब बेरड, इतर कार्यकर्ते व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.