प्राईड अँकेडमी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तृतीयपंथी साहित्यिक दिशा शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्राईड अँकेडमी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तृतीयपंथी साहित्यिक दिशा शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण
टाकल्यावर प्रतिनिधी- देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच औचित्य साधून
समाजातील प्रत्येक घटकाला सारखं महत्व आणि सारखा सन्मान मिळावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न – संस्थापक, सभापती – *डॉ.वंदनाताई मुरकुटे*
भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देताना कुठेही स्त्री किंवा पुरुष असा उल्लेख केलेला नाही. आम्ही या देशाचे नागरिक असतानाही आम्हाला समाजात मानाचं स्थान दिलं जात नसताना आमच्या हस्ते ध्वजारोहण करून दिलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचं तृतीयपंधी कार्यकर्ती ,कवियत्री व लेखिका दिशा शेख यांनी प्राईड अँकेडमी येथे बोलताना व्यक्त केले.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बरकतअली शेख, तृतीयपंथी आशु शेख, शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून बोलताना बरकत अली म्हणाले की,माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे यांनी भगीरथ प्रयत्नाने ज्ञान गंगा ग्रामीण भागात स्थापित केली.डॉ.मुरकुटे ह्या हाडाच्या शिक्षिका असून पंचक्रोशीत दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथीयांना, आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने तरी त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे.
कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं, कोणी नवीन व्यवसाय सुरू केला किंवा कोणाच्या घरी लग्न वा अन्य मोठा सामाजिक समारंभ असेल, तरच आपल्या समाजाला तृतीयपंथीयांची आठवण येते. पण तृतीयपंथी हे समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना आजही वेग�