बेलापूरात सोळा मंडळांनी केली श्री गणेशाची स्थापना

बेलापूरात सोळा मंडळांनी केली श्री गणेशाची स्थापना
सामाजिक धार्मिक परंपरा लाभलेल्या बेलापुर गावाने विना पोलीस बंदोबस्तात श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असुन सर्वच मंडळांनी याचे अनुकरण करावे असे अवाहन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी केले आहे बेलापुर येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते या वेळी मा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद तंटामूक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे एकनाथ नागले प्रफुल्ल डावरे आलम शेख अशोक पवार आदिंनी मनोगत व्यक्त करताना शांततेत गणोशोत्सव साजरा करतानाच पोलीस बंदोबस्त न घेता गाव बंदोबस्तात गणेश विसर्जन करणार असल्याचे सांगितले प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले .दोन वर्षानंतर गणोशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यास मिळाल्यामुळे बेलापुरगावात सोळा मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असुन उक्कलगाव येथे चार बेलापुर खूर्द येथे तीन तर वळदगाव येथे एका मंडळाने श्रीगणेशाची स्थापना केली आहे कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव साजरा करण्यास मिळाला नाही या वर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले त्यामुळे या वर्षी सर्वत्र थाटामाटात गणरायाचे आगमन झाले या वर्षी बेलापूरात सोळा मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली आहे त्यात सिद्धी विनायक युवा मंच ,सप्तशृंगी माता मित्र मंडळ, हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळ, जय श्रीराम मित्र मंडळ, एकदंत तरुण मंडळ ,धर्मविर शंभुराजे प्रतिष्ठाण ,श्रीराम हेल्थ क्लब मित्र मंडळ, अष्ठविनायक मित्र मंडळ, श्री छत्रपती तरुण मंडळ, लक्ष्मीमाता मित्र मंडळ देवा गृप ,जय शिवराय मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ खटकाळी, धर्मविर संभाजी राजे मित्र मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ कुऱ्हे वस्ती, गणराज तरुण मंडळ मेहेत्रे वस्ती, त्रिमूर्ती मित्र मंडळ गायकवाड वस्ती आदि मंडळाचा समावेश आहे उक्कलगाव येथेही माणूस गृप उक्कलगाव ,श्री गणेश मित्र मंडळ पटेलवाडी ,बजरंग गृप ,विघ्नहर्ता मित्र मंडळ या मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. बेलापुर खूर्द येथे जय मल्हार मित्र मंडळ,रामराज्य मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ या मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली वळदगाव येथेही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असुन सर्वांनी गणेशोत्सवांचा आनंद लुटताना सामाजिक शांतता भंग होणार नाही याची दाक्षता घ्यावी असे अवाहन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी केले आहे .शांतता कमीटीच्या बैठकीस सर्वश्रीअजिज शेख सिद्धार्थ जगताप ,अक्षय नाईक ,प्रशांत भोकरे ,युवराज जोशी ,मोहसीन ख्वाजा शेख ,अशोक प्रधान अशोक गवते ,अकबर टिन मेकरवाले ,उमेश बारहाते ,कासम शेख रफीक शेख ,शेख जाकीर युवराज जोशी विष्णूपंत डावरे महेश कुऱ्हे ,रमेश अमोलीक गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे ,शिवाजी भोसले मुस्ताक शेख प्रतिक मुथा सोमनाथ जाधव ,राहुल माळवदे ऋतुराज दाणी,रोहीत नागले उपस्थित होते