गटारी मध्ये बसून भाजपचे नारायण काळे यांचे अनोखे आंदोलन…
गटारी मध्ये बसून भाजपचे नारायण काळे यांचे अनोखे आंदोलन…
टाकळीभान येथील भाजप जनता युवा मोर्चाचे मा. जिल्हा उपाध्यक्ष नारायण काळे यांनी ठरल्याप्रमाणे ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे थेट गटारीतच बसून अनोखे आंदोलन केले. गेल्या वर्षभरापासून या प्रभाग क्रमांक दोन मधील या गटारीच्या कामा संदर्भात येथील नागरिकांची गटार व्हावी अशी मागणी होती. या रोडलगत गटार नसल्याने सांडपाणी जाण्याची कोणतीही सोय नसल्याने मोठ्या समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने नवीन पदभार घेतल्यानंतर सत्ताधारींनी त्यांना गटार होण्यासंदर्भात आश्वासन दिले होते त्यानुसार पाच-सहा महिन्यांपूर्वी चारीच्या कामासाठी नळ्या येऊन पडल्या होत्या, त्याचप्रमाणे जीसीपी ने गटार खाण्यात आली होती, परंतु अचानक पणे तेथील नळ्या दुसरीकडे हलवण्यात आल्यावर संबंधित गटार बुजवण्यात आली, ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर सदर या वृत्तपत्रांमध्ये तशी बातमी ही प्रसिद्ध झाली होती, परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. वेळोवेळी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांकडे अर्ज दिले होते, परंतु कोणतीही दखल घेतली गेली नाही. ही बाब भाजपचे नारायण काळे यांच्या लक्षात आल्यानंतर नारायण काळे याच प्रभाग दोन मध्ये राहतात, त्यांनी तीन चार दिवसापूर्वी प्रसिद्धी पत्र काढून सदर गटारीच्या कामासंदर्भात निर्णय न घेतल्यास गटारीतच बसून आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. सोमवार दिनांक 4 जुलै रोजी ठीक दहा वाजता प्रभाग क्रमांक दोन मधील वाडगाव रोड रस्त्यालगतच्या गोती सर यांच्या घरालगतच्या ठिकाणी असणाऱ्या गटारी मध्ये बसून ढोल ताशाच्या गजरामध्ये अनोखे आंदोलन केले. काही वेळा मध्येच त्या ठिकाणी मा. सभापती नानासाहेब पवार, उपसरपंच कान्हा खंडागळे यांना ही बाब समजताच त्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी धाव घेतली. नारायण काळे व येथील नागरिकांना आठ-दहा दिवसात या गटारीचे काम सुरू करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने कान्हा खंडागळे यांनी दिले. त्यानंतरच नारायण काळे गटारीतून उठले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार ,प्रभाग दोन मधील सदस्य भाऊसाहेब पटारे, अशोक कचे, मुकुंद हापसे, भाऊसाहेब पवार, सुभाष ब्राह्मणे, गोतीस सर, किशोर हुळहुळे, राजेंद्र हुळहुळे, बापूसाहेब शिंदे, दिलीप पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.हे अनोखे आंदोलनासाठी यावेळी बघ्यांची यांची गर्दी झाली होती. यावेळी सरपंच पती आप्पा यशवंत रणनवरे व ग्रा.सदस्य सुनील बोडखे यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी नागरिकांची भेट घेतली व नागरिकांना गटारीच्या कामाबाबत आश्वासन दिले.