उच्च दाबाने विज पुरवठा झाल्यामुळे अनेकांच्या घरातील विज उपकरणे जळाली पंचनामे सुरु
उच्च दाबाने विज पुरवठा झाल्यामुळे अनेकांच्या घरातील विज उपकरणे जळाली पंचनामे सुरु
बेलापुर (प्रतिनिधी )शिवनेरी गल्लीत असणाऱ्या विज पुरवठा करणाऱ्या डी पी वर झालेल्या तांत्रीक बिघाडामुळे त्या भागात विज पुरवठा असणाऱ्या ग्राहकांचे फ्रिज पंखे हिटर गिझर पाण्याच्या मोटारी मोबाईल जळाले असुन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बेलापुरातील शिवनेरी गल्लीत बसविण्यात आलेल्या डी पी वर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक बिघाड झाला आर्थिंगची वायर कट झाल्यामुळे अचानक विजेचा दाब वाढला त्यामुळे या डी पी वरुन विज पुरवठा होणाऱ्या नवले गल्ली आरुण कुमिर वैद्य पथ काळे गल्लु शिवनेरी गल्ली धनगर गल्ली येथील ग्राहकांच्या घरातील विजेची उपकरणे पेटली या भागातच पाणी पुरवठा असल्यामुळे सर्वांच्या विज मोटारी सुरु होत्या अनेकांच्या मोटारी जळाल्या काहीचे चार्जींगला लावलेले मोबाईलही जळाले फ्रिजही जळाले जयराम शेळके यांनी कमरेत गँप असल्यामुळे आरामदायक अशी सव्वा लाख रुपयांची गादी आणली होती ती ही जळाली ही माहीती समजताच बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी घरोघर जावुन नुकसानीची माहीती घेतली मोठ्या प्रमाणात ग्राहकाचे नुकसान झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महावितण अधिकाऱ्याशी संपर्क साधला महावितरण अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखुन घरोघर जावुन पंचनामे सुरु केले असुन महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलींद दुधे मधुकर औचिते स्वप्निल पाटील यांनी घरोघर जावुन नुकसानीचा आढावा घेतला विज पुरवठा खंडीत असल्यामुळे किती नुकसान झाले याचा अंदाज येवु शकत नसला तरी घरातील सर्व विजेची उपकरणे जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आशा प्रकारे महावितरण कडून सामुहीक पंचनामे होण्याची ही बेलापुरातील पहीलीच घटना आहे विज पुरवठा सुरळीत झाल्यावरच नुकसानीचा खरा अंदाज येणार आहे