*छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते आई त्वरितादेवीची महाआरती व खरीपाच्या पेरणीला शुभारंभ करणार*
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे कोल्हापूर संस्थानचे युवराज व गोरगरीब अठरापगड, बारा बलुतेदारचे कैवारी छत्रपती संभाजीराजे भोसले हे दिनांक 27/06/2022 सोमवार रोजी दुपारी 01:00 वाजता येणार असुन त्यांच्या शुभहस्ते श्री.आई त्वरितादेवी संस्थान मंदिरात त्वरितादेवी ची महाआरती होणार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, राज्यात सत्ता पालटाचे वारे वाहत असतांना देखील खुद्द गोरगरिब रयतेचे कष्टकरी शेतकऱ्यांचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे बीड जिल्हा दौ-यावर येत आहेत. श्री. आई त्वरितादेवी संस्थान तलवाडा येथे दि. 27/06/2022 सोमवार रोजी श्री.आई त्वरितादेवीचे दर्शन घेऊन त्वरितादेवीची महाआरती करणार आहेत. छत्रपती संभाजीराजे भोसले हे विविध विषयांवर शेतकरी कष्टकरी वर्गाशी संवाद साधण्यासाठी तसेच तलवाडा येथे खरीप हंगामाच्या पेरणीचा स्वत: तिफन चालुन शुभारंभ देखील करणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बॅक मध्ये जावून शेतर-यांच्या समस्या देखील जाणुन घेणार आहेत. या प्रसंगी त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी तलवाडा पंचक्रोशीतील गंगावाडी, चव्हाणवाडी, गोविंदवाडी, आनंदवाडी, आंतरवाली, बेलगुडवाडी, राहेरी, भोगलगांव, पांढरी, देवितांडा, पोईतांडा, राजापूर, गोळेगाव सह अनेक गांवातील तमाम शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तेची उलथापालथ होत असतांना देखील शेतक-यांचे कैवारी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले बिड जिल्ह्यातील शेकक-यांशी बांधावर जावुन संवाद साधणार आहेत सध्या कष्टकरी शेतकरी यांना कोणीच वाली उरला नसून त्यांच्या समस्या सोडवण्याच्या द्रुष्टीने हा दौरा असणार आहे. असे तलवाडा पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी कळवले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा