आळंदी च्या शिवसेनेची निष्ठा मातोश्री शी कायम*

*आळंदी च्या शिवसेनेची निष्ठा मातोश्री शी कायम*
*आम्हीं उद्धव साहेबांशी इमान राखणार गद्दारांना धडा शिकवणार याची शपथ घेत घोषणा बाजी*
महाराष्ट्र राज्य शासन यांचेवर टांगती तलवार आहे . शिवसेनेशी बांधीलकी तोडत गट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेना हा जनतेचा पक्ष तमाम हिंदू बांधवांनी दिलेला निर्णय मान्य असेल म्हणत वर्षा निवास सोडले. हा प्रकार तळा गळा तील शिव सैनिकांच्या जिव्हारी लागला. आमचं दैवत उद्धव साहेब आणि मातोश्री च्या गद्दार यांना क्षमा नाही म्हणत महाराष्ट्र भर शिवसैनिक हा हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पायशीच निष्ठा राखणार म्हणत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करत रस्त्यावर उतरला
आहे. त्याचे पडसाद आळंदीत उतरत आळंदी शहर शिवसेना ने तीव्र आंदोलन करत आम्हीं उद्घव ठाकरेच्या पायी निष्ठा राखतो . आमचे इमान मातोश्री शी मरण आले तरी राहणार अशी शपथ घेत. आळंदी च्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका पाशी जमत शिवसैनिक आक्रमक झाले होते. गद्दार यांना क्षमा नाही अश्या घोषणा देत.निषेध करत आंदोलन केले आहे.यावेळी शिवसेना नेते उत्तम गोगावले. माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर. शहर प्रमूख अविनाश तापकीर. माजी नगरसेवक रमेश गोगावले. माजी नगरसेवक आनंदा मुंगसे. अनिताताई झुंजम. महीला अध्यक्षा मंगल हुंडारे. भागवत सोमवंशी. आशिष गोगावले. शशी राजे जाधव. तुषार तापकीर. मनोज पवार. बालाजी शिंदे. राहुल गोरे. अनिकेत डफळ. राहुल सोमवंशी.s निखिल तापकीर. गणेश नेटके. आदी शिवसैनिक या यावेळी उपस्थित होते.