ब्रेकिंगमहाराष्ट्र

समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांचा स्थानिक ग्रामस्थ विस्वस्थ हवा. यासाठी दावा. देवस्थानने ग्रामस्थांना दिलेल्या वागणुकीबद्दल तीव्र पडसाद*

*समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांचा स्थानिक ग्रामस्थ विस्वस्थ हवा. यासाठी दावा. देवस्थानने ग्रामस्थांना दिलेल्या वागणुकीबद्दल तीव्र पडसाद*

 

काल गुरुवार दिनांक 15 6 2023 रोजी समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांची मीटिंग भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये घेण्यात आली या मीटिंगमध्ये खालील प्रमाणे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आळंदीचे माजी विरोधी पक्ष नेते अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष डीडी भोसले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या मीटिंगमध्ये खालील ठरावांना मंजुरी देण्यात आली

 सर्वानुमते मंजुरी देण्यात आलेले ठराव 

1श्री डी भोसले पाटील यांनी आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्वप्रथम व्यक्त केलेल्या स्थानिक युवकांनी गोंधळ घातल्याच्या खोट्या वक्तव्याला विरोध करत याबाबत योग्य खुलासा न केल्याने निषेध व्यक्त केला वारी नंतर आता तरी योग्य पार्श्वभूमी समोर आल्याने ते स्थानिक युवक नव्हते असा खुलासा करावा अन्यथा त्याबाबत तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि निषेध ठराव मंजूर केला जाईल अशी भूमिका मांडली.

2 देवस्थाने आळंदीकर ग्रामस्थ यांना दिलेल्या वागणुकीबद्दल तीव्र पडसाद आजच्या बैठकीत उत्पन्न झाले समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांनी देवस्थानच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत अशोभनीय कृत्य केल्याच्या बाबत खेद व्यक्त केला. तसेच समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या मार्फत विश्वस्त नेमणुकीमध्ये तीन ग्रामस्थ आणि दोन वारकरी यांना विश्वस्त म्हणून संधी देण्यात यावी. आणि ग्रामस्थ विश्वस्त घेण्यात यावे सर्वांनुमते हा ठराव घेण्यात आला. या दोन वारकऱ्यांचा समावेश असावा ही बाब नमूद करण्यात आलेली आहे

3 श्री भैरवनाथ महाराज यांच्या साक्षीने येथून पुढच्या काळामध्ये सर्व ग्रामस्थ यांनी गट तट राजकीय भेदभाव बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकत्र येत गावाची अस्मिता जपण्याची भूमिका घ्यावी सर्व पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवावेत व्यक्तिगत राग लोभ बाजूला ठेवावा आणि त्यासाठी कार्यरत होण्यासाठी एक संघ राहण्याची शपथ घ्यावी असाही ठराव आजच्या ग्रामस्थ मीटिंगमध्ये घेण्यात आला.

4 या मीटिंगमध्ये श्री प्रकाश कुऱ्हाडे पाटील.संजय घुंडरे पाटील .साहेबराव कुऱ्हाडे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

4 श्री प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आळंदीकर ग्रामस्थांनी एकजूट राहणे किती गरजेचे आहे याचा विशेष उल्लेख करत. संत तुकोबारायांच्या प्रस्थान सोहळ्यासारखी आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळा सुरेख आणि सुबक करण्यासाठी स्वयंशिस्त लावावी. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावयाचे आहेत.यावर मार्गदर्शन केले. तसेच पालखी ला खांदा देताना पालखीची हेळसांड केली जाते. मुळात पुढे सहा आणि मागे सहा अशे बारा लोकं सहज पालखी उचलू शकतात. असे असताना देखील प्रस्थानात गोंधळ होतो.त्यावर आपण सुधारणा करायची आहे.आणि प्रयत्न करायचे आहेत. असे मनोगत व्यक्त केले.

5 श्री संजय घुंडरे पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिरे समितीचे धर्तीवर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आळंदी (देवाची) येथे विश्वस्त संख्या वाढवली जावी हा आमचा आग्रही मुद्दा राहील . त्याचबरोबर ग्रामस्थ तीन आणि दोन वारकरी यांना विश्वस्त पदी संधी देण्याची मागणी केली ती मागणी लावून धरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावयाचे आहेत असे मार्गदर्शनात व्यक्त केले

6.समस्त ग्रामस्थ आळंदीकर या नावाने, फक्त रजिस्टर असलेल्या भैरवनाथ उत्सव कमिटी पत्राचा वापर केला जावा काही दिवसापूर्वी आळंदी पोलीस स्टेशन मध्ये सत्कारासाठी गेलेल्या काही लोकांनी समस्त ग्रामस्थ आळंदीकर नावाचा उल्लेख केला सत्कार केला. त्याबद्दल दुमत नाही परंतु त्यामध्ये ग्रामस्थांना कुणालाही कळवण्यात आलेले नव्हते आणि दोन-तीन लोकांनी जाऊन सत्कार केला त्यावर आक्षेप आहे.असेच इतर ठिकाणी ही होते म्हणून रजिस्टर असलेल्या समस्त ग्रामस्थ आळंदीकर भैरवनाथ उत्सव मंडळ या पत्राचा वापर करावा असे सर्वांमध्ये ठरवण्यात आलेले आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे