शंभु महादेवाच्या याञौत्सवात आर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरु आसताना काही समाजकंटकांनी आंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाच्या बाजुने दगडफेक
शंभु महादेवाच्या याञौत्सवात आर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरु आसताना काही समाजकंटकांनी आंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाच्या बाजुने दगडफेक
टाकळीभान येथे दोन दिवस सुरु आसलेल्या शंभु महादेवाच्या याञौत्सवात काल मंगळवारी राञी १०.३० वाजेच्या दरम्यान आर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरु आसताना काही समाजकंटकांनी आंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाच्या बाजुने दगडफेक केल्याने प्रेक्षकांची पळापळ झाली. बंदोबस्तासाठी आसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकारामुळे माञ याञौत्सवाला गालबोट लागले आहे.
टाकळीभान येथील शंभो महादेवाचा याञौत्सव दरवर्षी दिमाखात पार पाडला जातो. दोन दिवस चालणाऱ्या या याञौत्यवाची तयारी याञा समिती महीणाभर मेहनत करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आसते. खास महीलांच्या मनोरंजनासाठी दुसऱ्या दिवशी आर्केस्ट्राचे आयोजन केले जाते. कुस्तीचा हगामा मोठा होत आसल्याने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामवंत मल्ल हजेरी लावुन कुस्तीचा आखाडा गाजवतात. यंदाही याञौत्सवानिमित्त कार्यक्रमाची रेलचेल होती.
शेवटची मानाची कुस्तीसाठी ताई प्रतिष्ठाणच्या वतीने रोख ११ हजाराचे बक्षिस ठेवण्यात आले होते.
दोन दिवस सुरु आसलेला हा याञौत्सव मोठ्या दिमाखात पार पडत आसतानाच राञीचा आर्केस्ट्रा सुरु आसतानाच काही समाजकंटक प्रवृत्तींनी आंधाराचा फायदा घेत कार्यक्रम स्थळाकडे दगडफेक केल्याने पोलिस कर्मचारी , याञा कमेटी सदस्य, कलाकार व काही नागरीकांना मार लागल्याने जखमी झाले. बंदोबस्तासाठी तैनात आसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने या समाज कंटकांची धरपकड करुन ताब्यात घेतले.
या घटनेत सोमनाथ लहानु गांगुर्डे, राहुल अशोक गांगुर्डे, बंडु लहानु गांगुर्डे, अविनाश राजु थोरात, संदिप चंद्रभान गांगुर्डे, सचिन नवनाथ बर्डे, सचिन बाबासाहेब बोरुडे, मंगेश बाळासाहेब पवार व इतर आठ ते दहा आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा रजि. नं. २११/२३ नुसार भादवि कलम ३५२, ३३२, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, १९०, ५०६ नुसार फिर्यादी पो.हे.काँ. रविंद्र सुकदेव पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मुठभर समाज कंटकांनी केलेल्या दगडफेकिमुळे चांगल्या प्रकारे सुरु आसलेल्या या भव्य दिव्य याञौत्सवाला माञ गालबोट लागले आहे. अचानक झालेल्या या दगडफेकिमुळे संख्येने मोठ्या आसलेल्या महीला प्रेक्षकांची पळापळ झाल्याने काही महीला व मुलेही किरकोळ जखमी झाले आहेत. संपुर्ण याञौत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी याञा कमेटीचे सदस्य, आप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागिय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दशरथ चौधरी, स.पो.नि. अतुल बोरसे व त्यांच्या सहकार्यांनी विषेश परीश्रम घेतले.