प्रहार जन शक्ती पक्ष नेहमीच शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवेल न्याय निळवुन देईल= सुरेशराव लांबे
प्रहार जन शक्ती पक्ष नेहमीच शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवेल न्याय निळवुन देईल= सुरेशराव लांबे
रब्बी हंगाम संपत आला तरी पहीले रोटेशन सोडावे म्हणुन प्रहार जन शक्ती पक्षांकडुन सतत प्रयत्न केले जात होते , अखेर प्रयत्नाला येष दिनांक 18 जानेवारी सायकाळी पाणी सोडावेच लागले,नाहीतर काहीनी पाणी सोडा या ऐवजी पाणी वापर संस्था बरखास्त करा अशा चुकीच्याच मागण्या केल्या होत्या असे सुरेशराव लांबे म्हणाले,
गेल्या दोन वर्षांपासुन अतिवृष्टीने महाराष्ट्रातील सर्व तलाव व धरणे पुर्ण क्षमतेने भरलेली असुन पाट पाण्याच्या योग्य नियोजना अभावी धरणात पाणी असुन देखील शेतकऱ्यांचे कांदा गहु ऊस व मुक्या जनावरांची चारा पिके जळुन खाक झालेली आहेत,
मुळा ऊजवा कॅनल हा राहुरी,नेवासा,शेवगाव,व पाथर्डी या चार तालुक्यातील कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी फारच मोठे वरदान आहे, या कार्यक्षेत्रातील सर्व प्रस्थापित पुढारी कारखानदार आहेत,
व त्यातील दोन पाणीदार आमदार मंत्री देखील आहेत या लोकप्रतिनिधींकडुन निवडणुकीत नेहमीच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असतो मात्र संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला तरी त्यांनी पाटपाण्याच्या योग्य नियोजन न केल्यामुळे धरणात पाणी असुन देखील शेतकऱ्यांचे ऊस कांदा गहु व मुक्या जनावरांची चारा पिके उपळुण चाललीत ह्या सर्व गोष्टीला विद्यमान सरकार मधील आमदार मंत्री आहेत
त्यातच विहीर बोअरवेल याला जे थोडेफार पाणी आहे ते विजे अभावी बंद आहे, महावितरणाने थकबाकीच्या नावाखाली चालु लाईट बंद करुन शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली आहे,
राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातुन राष्टवादी आमदार अनपेक्षित निवडुन आले आहेत,त्यातच ते अनपेक्षित सत्ताधारी सरकार मधे सहभागी आहेत,त्यातच ते अनपेक्षित चार पाच खात्याचे मंत्री झालेत,
हे सर्व अनपेक्षित मिळाले तरी त्यांच अजुनही समाधान होईना ते तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नावर लक्ष देण्याचे सोडुन ते नगर जिल्ह्याचे पालक मंत्री पद मिळविण्यात दंग झाले आहेत, आहो ना प्राजक्त दादा तनपुरे आतातरी समाधानी रहा व ज्या लोकांनी ज्या आशेने तुम्हाला मते दिली आता त्यांना समाधानी करा असा सल्ला वजा आरोप प्रहार जन शक्ती पक्षांचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केले,
त्या प्रयत्नाला अखेर काल दिनांक 18/1/2022/ वार मंगळवार रोजी सायकाळी यश आले कॅनला पाणी सोडले ,
नगराध्यक्ष पदावर असताना व राज्य सरकारच्या सत्तेवर नसताना प्राजक्त तनपुरे ज्या मागन्या करत होते ,
त्याच मागन्या आता ना प्राजक्त तपुरेनी पुर्ण कराव्यात असे सुरेशराव लांबे म्हणाले
कॅनला पाणी आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य दाबाने कमीतकमी 8 तास ते जास्तीत जास्त 12 ते 16 तास विज पुरवठा सुरळीत व्हावा,शेतकऱ्यांकडे जो पर्यंत पैसे येत नाहीत तो पर्यंत विज बिल भरणार नाहीत कृषी मुल्य आयोग शेतीच्या उत्पादन खर्चात विजबील खर्च धरत नाही त्यामुळे शेती पंपाला मोफत वीज पाहीजेत अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांसाठी प्राजक्त तनपुरे सतत करत होते,
त्या मागण्या मागील लोकप्रतीनीधी व सरकारने मान्य केल्या नाहीत म्हणुन तनपुरेनां विधानपरिषदेत पाठवले यांनीतर सर्व सामान्य जनतेच व शेतकऱ्यांच जास्तच डोक ऊठवल असा मत प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी शेवटी व्यक्त केले,
प्रतिनिधी
गोरक्षनाथ वाघमोडे