ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांना किमान हे.75 हजार तर शेतमजुरांच्या कुटुबांस 20 हजार मदत त्वरीत द्यावी =सुरेशराव लांबे

केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांना किमान हे.75 हजार तर शेतमजुरांच्या कुटुबांस 20 हजार मदत त्वरीत द्यावी =सुरेशराव लांबे पाटील

 

 गेल्या अनेक महिन्यापासुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतत मोठ्या प्रमाणात पाऊस चालु असुन परतीच्या पावसांमंध्ये संपुर्ण राहुरी तालुक्यात व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ठग फुटीचा पाऊस होऊन शेतकऱ्यांचे खरीपातील सोयाबीन कपाशी कांदा,फळबागा व जनावरांचे चारा पिके संपुर्ण उपळुन गेली आहे,तर मुख्य पिक असलेल्या उसालाही मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले,

 

परंतु या मतदार संघतील आजी व माजी आमदार मात्र शेतकरी व शेतमजुर यांच्या प्रलंबीत प्रश्नावर दुर्लक्ष करुन श्रेयवादासाठी एकमेकांवर टीका टीपनी करन्यात व्यस्त आहेत.

 

 

यांना शेतक-यांची आठवण फक्त निवडणुकीतच येते, सततच्या पावसामुळे अनेकांचे रहाते घरही उध्दवस्त झाली ,अनेक वाड्यावस्तीवर जान्यायेन्यासाठी रस्ते नाहीत, शेतमजुरांच्याही हाताला काम नाही, गेल्या सप्टेंबर महिन्यात आम्ही शासनाकडे सरसकट पंचनामाची मागणी केली असता अजूनही मिरी करंजी गट व अनेक गावांमध्ये समाधानकारक पंचनामे झालेले नाहीत व शासनाने जाहीर केलेली मदतही अद्यापही कोणत्याच शेतकऱ्याला मिळाली नाही,

 

 

तरी शासनाने राहिलेले पंचनामे सरसकट करून सर्व शेतक-यांना किमान हेक्टरी 75 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व शेतमजुरांना प्रत्येक कुटुंबाला 20 हजार त्वरीत द्यावेत व ओला दुष्काळ जाहीर करुन शेतीमालाला हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांची व शेतमजुरांची दिवाळी गोड करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली,

निवेदनात लांबे यांनी शेतकऱ्यांची व शेतमजुरांची चालु असलेली परस्तीती मांडताना सांगीतले देशाला स्वातंत्र्य मिळऊन 76 वर्षे झाली तरी सुद्धा आपल्या असलेल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र व निवारा याही भागवणे त्यांना शक्य होत नाही,त्यातच गेली दोन वर्षापासून अतिवृष्टी कोरोना या सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी व शेतमजुर यांच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, अशातच चालु वर्षी अनेक महीन्यापासुन मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, सततच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेली शेतक-यांची खरीपातील सर्व पिक हे उपळुन गेली आहे,व शेतमजुरांनाही सततच्या पावसामुळे हाताला काम नाही,

 

त्यातच दिवाळी सारखा मोठ्या सनाला कपडे,किराणा,लहान मुलांचे समाधान करन्यासाठी फटाके या सर्व आवशक वस्तुसाठीही कुनाकडेच पैशे नाहीत,तरी शिंदे फडणवीस सरकारने नुसत्या घोषणा करण्या पेक्षा केंद्र सरारची मदत घेऊन सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 75 हजार रुपये,व शेतमजुरांना प्रत्येक कुटुंबाला 20 हजार मदत त्वरीत करावी व सर्वाची दिवाळी गोड करावी,तसेच महाराष्ट्रामंध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केली,

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे