ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीरामपूर येथे शिवसेनेचा मंगळवारी मेळावा
श्रीरामपूर येथे शिवसेनेचा मंगळवारी मेळावा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ३०) श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे व शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिली आहे. युवा सेना, महिला आघाडी, वाहतूक सेना व सर्व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकणे व बडदे यांनी केले आहे.