धार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
पहिल्यांदाच आगळावेगळा बैल पोळा

पहिल्यांदाच आगळावेगळा बैल पोळा
घोगरगाव येथे पहिल्यांदाच आगळावेगळा बैल पोळा ,सेवानिवृत्त कालवा निरीक्षक ,आबासाहेब पटारे, यांच्या हस्ते विधिपूर्वक पूजा करून फित कापून पोळा भरविण्यात आला ,व शेतकरी राजा आनंदी झाला,
सध्या बैलाचे प्रमाण घटले असून, यांत्रिक युगाकडे शेतकरी वळत आहे, त्यामुळे बैलपोळ्याचे सणाचे महत्त्व कमी होत आहे, आबासाहेब पटारे मित्र मंडळाच्या वतीने बैलांची मिरवणूक ढोल ताशा डीजे फटाकड्याची अप्रतिम आतिषबाजी करून ,आबासाहेब पाटील यांच्या हस्ते बैलांना पोळ्याचा निवद देऊन फीत कापून पोळा भरविण्यात आला, पहिल्यांदाच असा पोळा भरल्यामुळे शेतकरी बांधवांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे ,
याप्रसंगी संभाजी पटारे, आबासाहेब घोगरे प्रकाश घोगरे, धनु कनगरे,बालम शेख, दिलवार पठाण ,प्रकाश पटारे, भाऊ पटारे, इसाक पठाण ,पेनू शेख ,आसिफ शेख ,मोठ्या शेतकरी उपस्थित होते,