ब्रेकिंग

गणेशखिंड येथे हरिनाम व पारायण सोहळा

गणेशखिंड येथे हरिनाम व पारायण सोहळा

 

 

श्रीरामपूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र गणेशखिंड येथे श्री गणेशोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला आहे.

देवस्थानचे विश्वस्त किसन महाराज फ्वार व आळंदीचे कृष्णा महाराज वाघुले, कारवाडी आश्रमाचे मठाधिपती संदीप महाराज जाधव यांच्या अधिपत्याखाली या सोहळ्याचे ध्वाजारोहण ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संपन्न झाले आहे. सोहळ्या दरम्यान सकाळी ७.३० वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ वाजता भजन, दुपारी ३ वाजता कीर्तन, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ याप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम होतील. शनिवार दि.७ सप्टेंबर – रोजी प्रकाश महाराज साठे – (धारूर), दि. ८ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर हैबती), सोमवार दि.९ सप्टेंबर रोज़ी रामेश्वर महाराज पवार, दि.१० स रोजी अक्क्रुर महाराज साखरे (गेवराई), दि.११ सप्टेंबर रोजी उध्दव महाराज मंडलीक (नेवासा), दि.१२ सप्टेंबर रोजी विलास महाराज सानप शास्त्री (गंगाखेड), दि. १४ सप्टेंबर रोजी अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणनाथगिरी महाराज, दि.१५ सप्टेंबर रोजी पुरूषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा), दि.१६ सप्टेंबर रोजी नेवासा येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मठाधिपती देविदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन पार पडणार आहे.

तर सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता भास्करगिरी महाराज यांची सदिच्छा भेट व त्यानंतर दुपारी १ वाजता व्याख्याते प्रथमेश विशाल वर्धावे यांचे छत्रपती संभाजी महाराजांची वास्तव जीवन गाथा होणार आहे. तर मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशीच्या दिवशी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा टाकळीभान, कारेगाव, भोकर, खोकर, कारवाडी, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, पाचेगाव, १२ चारी, मातापूर, भेर्डापूर, निपाणी वाडगाव, वडाळामहादेव तसेच पंचक्रोशितील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वरद गजानन देवस्थान विश्वस्त मंडळ, श्रीक्षेत्र गणेशखिंड परिसर, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे