भगत यांच्यावर अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा, कर्डिलेनाच तडीपार करा ,,,आ तनपुरे यांची मागणी

भगत यांच्यावर अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा, कर्डिलेनाच तडीपार करा ,,,आ तनपुरे यांची मागणी
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अभिषेक विजय भगत यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी करावी व दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केली. यावेळी त्यांनी कोर्टाचे आदेश असताना देखील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी तसेच एडवोकेट अभिषेक भगत यांना पोलीस संरक्षण मिळावे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना देखील तडीपार करण्याची मागणी आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केली. येत्या आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा आ. प्राजक्ता तनपुरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिल कातकडे यांना निवेदनाद्वारे दिलाय.
शशिकांत गाडे रोहिदास कर्डिले बाळासाहेब हराळ अभिषेक कळमकर संजय झिंजे दिलीप सातपुते संदेश कारले किरण काळे संग्राम कोतकर शरद झोडगे केशव बेरड गिरीश जाधव सुवेंद्र गांधी बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते.