पाटबंधारे पतसंस्थेचा कारभार पारदर्शी* – *मंत्री राधाकृष्ण* *विखे पाटील*
*पाटबंधारे पतसंस्थेचा कारभार पारदर्शी* – *मंत्री राधाकृष्ण* *विखे पाटील*
सकाळी १० वा. कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण)_ पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेने काळाची गरज ओळखून संगणक प्रणाली व मोबाईल ॲप सुरू केले असून त्यामुळे आधुनिक युगात सभासदांसाठी संचालक मंडळाने एक नवीन पाऊल टाकले असल्याचे महसुलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर सभासदाची संपूर्ण माहिती स्वतःच्या मोबाईलवर मिळणे म्हणजे संचालकांचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्याचे दिसते. आजच्या आधुनिक युगात सहकार क्षेत्रातील संस्था हायटेक होणे गरजेचे आहे.देशाला आणि पतसंस्थेला 75 वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्षात सभासदांना संचालक मंडळाने दिलेली ही एक भेटच आहे. तसेच संस्थेचा एनपीए नगण्य असल्याने संचालक मंडळाचा कारभार पारदर्शी असल्याचे स्पष्ट होते. यापुढेही संचालक मंडळांनी असाच पारदर्शी कारभार सुरू ठेवावा अशी भावना व्यक्त करुन भाषणातच चेअरमन उमेश डावखर ,व्हाईस चेअरमन अजय लखापती व संचालक मंडळाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगरचे माननीय गणेश पुरी साहेब होते त्यांनीही त्यांच्या भाषणात संस्थेची आर्थिक स्थिती व कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.तसेच प्रमुख पाहुणे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष व कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नोर साहेब यांनी प्रारंभी संस्थेची माहिती विशद करून संचालक मंडळाच्या कामाचे कौतुक करून पुढील कारभारासाठी शुभेच्छा दिल्या. माननीय मंत्री विखे पाटील साहेब यांच्या हस्ते रिमोट ची कळ दाबून संगणक प्रणाली व मोबाईल ॲपचे उद्घाटन स्क्रीनवर करण्यात आले व त्यानंतर कोनशिलेचे अनावरण मंत्री विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. संचालक व माजी चेअरमन नारायणराव तमनर यांनी उपस्थित मंत्री महोदय, कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे, सभासद या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचा कर्मचारी वृंद व संचालक मंडळ यांनाही धन्यवाद दिले. कार्यक्रमासाठी सर्वश्रि संचालक नवनाथ घोंगडे,शांताराम आवारी, ललित पवार, शिवाजीराव तोरणे, दीपक वाळके, प्रियंका मिसाळ, दत्तात्रय गडाख तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर हळगावकर सह आदी कर्मचारी व सभासद उपस्थित होते.