पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी बँड पथकाच्या तालावर धरला ठेका*

*आळंदी पोलीस स्टेशन मधील गणपती बाप्पाची उत्साहात विसर्जन मिरवणूक*
*पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी बँड पथकाच्या तालावर धरला ठेका*
आळंदी देवाची येथील आळंदी पोलिसांच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक आळंदीत आकर्षणाची ठरली .
बंदोबस्ताचा प्रचंड तणाव पोलीस बांधवांवर नेहमीच असतो यावर्षी सुमारे दोन वर्षानंतर जागतिक महामारीच्या विळख्यातून बाहेर पडत सर्वजण धार्मिक कार्यामध्ये सहभागी होत आहेत, याच पार्श्वभूमीवर आळंदीतील पोलीस अधिकारी ,हवालदार ,शिपाई ,या सर्वांनी फेटा आणि शुभ्र वस्त्र परिधान करत बँड पथकावर ताल धरत उत्साह साजरा केला, येणाऱ्या काळामध्ये इतर बऱ्याच तणावपूर्ण बंदोबस्ताच्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असताना पोलीस अधिकाऱ्यांना सुट्टी हा विषय माहीत नसतो म्हणून आम्ही माणूस आहोत वर्दीतला पोलीस हा सामान्यप्रमाणे आज गणपती रायापाशी मागणी मांडत उत्साह साजरा करताना दिसला, कायदा सुव्यवस्थेचा पालन चोख करत असताना बऱ्याच वेळा त्यांच्या आनंदावर विरजण येत होते ,पण एक वेगळा विचार आणि वेगळी काम करण्याची करण्याची उर्मी यावी यासाठी सदर मिरवणूक हे आकर्षण ठरत नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली, आळंदीतली सदर ही पहिलीच मिरवणूक इतकी उत्साही असल्यासारखे वातावरण सर्वत्र दिसून आले, दरम्यान पोलीस पीएसआय विद्या मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात उद्याच्या काळामध्ये विसर्जनाचा असणारा प्रचंड तणाव हा कायदा आणि सुव्यवस्था त्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आम्ही सर्व जबाबदारीतून मुक्त होत नागरिकांना कायदा प्रशासनाची काळजी घेण्यासाठी सूचना करण्यासाठी सदर गणेशोत्सव मिरवणूक ही आदल्या दिवशी काढल्याचे सर्व पोलीस स्टाफच्या वतीने जाहीर केले, प्रत्येक पोलीस अधिकारी आणि हवालदार यांच्या डोक्यावर असलेला भगवा फेटा आणि पांढरा लांब कुर्ता हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि नाचत नाचत ठेका धरत असताना नागरिकांचा त्यांच्याकडे आश्चर्यतेने पाहण्याचा आनंदाचा क्षण हा विलोभनीय होता.
सर्व महिला पोलिस कर्मचारी आणि पुरुष पोलिस या गणरायाच्या ईतर मिरवणुकीत वाहतूक व तसेच जमावाचे नियोजनबद्ध आयोजन करत असतात, आज मात्र माझा दिवस हा आनंद पोलिस अधिकारि कर्मचारी लपवू शकले नाही. परंतु काहीं पोलिस जसे की मच्छिंद्र शेंडे , पोलिस नाईक राजगुरू , ठाणे अंबलदार टोके, मात्र डोक्यावर भगवा फेटा , पांढरा कुर्ता असूनही पोलिसांच्या खाकी वर्दी चे कर्तव्य बजावताना दिसले,